अकोल्यात दिव्यांगांची अनोखी मतदार जनजागृती रॅली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी । राज्यात २१ ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृती रॅलीस प्रारंभ करण्यात आला.

ही रॅली शहराच्या विविध भागातून काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये दिव्यांगांनी हातात मतदान जागृतीचे फलक घेतले होते. यावेळी जिल्ह्यातील विविध शाळांमधून दिव्यांग विद्यार्थी तसेच दिव्यांग नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इतर महत्वाच्या बातम्या –