हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू असून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत तर काही विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. एकीकडे सरकार कडून विद्यार्थ्यांच्या सुटकेवरून श्रेय घेण्याचे काम सुरू असतानाच दिव्यांशी सचान या विद्यार्थिनींने सरकार वर संताप व्यक्त केला आहे. आम्ही 15 किमी चालत गेलो. भारतीय दूतावासाने कोणतीही मदत केली नाही, याला सुटका म्हणतात का? असा थेट सवाल तिने केला आहे.
दिव्यांशी म्हणाली, आम्ही विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका केली असा सरकारचा दावा असेल तर तो पूर्णपणे खोटा आहे. पोलंडहून मोफत विमान प्रवास करून भारतात आणणं याला सुटका म्हणत नाही. भारत सरकारनं युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी आमची मदत केली असती तर त्याला सुटका म्हणता आलं असतं. देशातल्या लोकांना सत्य कळायला हवं, असं दिव्यांशी म्हणाली.
‘आम्ही खूप अस्वस्थ होतो, आम्ही आमची स्वतःची बस केली, पैसे दिले आणि स्वखर्चाने सीमेवर पोहोचलो. तिथे गेल्यावर कळलं की 12 ते 15 कि.मी. अजून चालावे लागणार . अन्न, पाणी, अंथरूणही आमचं आम्हीच घेतले होते . सरकारकडून आम्हाला काहीही दिले गेले नाही. सरकारने तर मागच्या वेळी सांगितले होते की, तुम्ही बाहेर गेलात तर त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. काही झाले तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. याची जबाबदारी सरकार घेत नाही.
वैयक्तिक खिशातून सुमारे तीन हजार रुपये दिले आणि सुमारे 50 कि.मी. पर्यंत चालावे लागले. उणे 10 ते 20 अंश तापमानात मी सीमेवर तीन दिवस आणि तीन रात्र खुल्या आकाशाखाली काढली, आमच्या मतदीला दूतवासातील कोणीही नव्हते असे तिने सांगितले