येत्या दिवाळीत सोने नव्हे तर क्रिप्टोकरन्सीद्वारे पडेल पैशांचा पाऊस ! आपण कुठे आणि कशी कमाई कराल हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने ही गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंतीची मालमत्ता आहे. यानंतर गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत. गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली असली, तरी सोमवारी बाजार सावरताना दिसून आले. त्याच वेळी, आजकाल गुंतवणूकदारांमध्ये क्रिप्टोकरन्सीबद्दल बरीच चर्चा होते आहे. अशा परिस्थितीत क्रिप्टोकरन्सी हा एक चांगला पर्याय ठरेल का आणि सोन्याशी स्पर्धा करू शकेल का?, असा प्रश्न उपस्थित होतो. आतापर्यंत बिटकॉइनच्या झगमगाटाने सर्वांनाच चकित केले आहे, तर मग प्रश्न असा उपस्थित होतो आहे की, या दिवाळीत सोने आणि बिटकॉइनमध्ये कोणता चांगला पर्याय असेल आणि पुढील दिवाळीपर्यंत क्रिप्टोसाठी काय दृष्टीकोन असेल? या दिवाळीत क्रिप्टो पैशांचा पाऊस पाडू शकेल का?

या संदर्भात मनी कंट्रोलने WazirX चे संस्थापक आणि सीईओ निश्चल शेट्टी, CoinSwitch.co चे संस्थापक आणि CEO आशिष सिंघल, ZebPay चे अविनाश शेखर यांच्याशी चर्चा केली. तो काय म्हणाले जाणून घेऊयात…
गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंतच्या क्रिप्टोच्या रिटर्नवर एक नजर

दिवाळीपासून दिवाळीपर्यंतचा रिटर्न
गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत Bitcoin ने 360 टक्के, Ethereum ने 1,023 टक्के, Polkadot ने 119 टक्के, Litecoin ने 299 टक्के, Ripple ने 361 टक्के, Stellar ने 384 टक्के, Cardano ने 2,005 टक्के आणि Dogecoin ने 10412 टक्के रिटर्न दिले आहेत.

क्रिप्टोबाबत महत्वाची माहिती
आत्तापर्यंत भारतात क्रिप्टोबाबत कोणतेही रेग्युलेशन नाही. क्रिप्टो नोटा किंवा कॉईन्सच्या स्वरूपात प्रिंट केले जात नाही आणि त्यासाठी कोणतीही बँक किंवा ATM देखील नाही. क्रिप्टो करन्सी हा डिजिटल मालमत्तेचा एक प्रकार आहे. अनेक देशांमधील शॉपिंग आणि सर्व्हिसेसमध्ये त्याचा वापर केला जातो. क्रिप्टो करन्सी मार्केट खूपच अस्थिर आहे. येथील प्रचंड चढउतारांमध्ये पैसे गमावण्याचा धोकाही असतो. त्यामुळे यामध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे टाळावे. गुंतवणूकदारांना ज्या टोकनमध्ये गुंतवणूक करायची आहे त्याबद्दल चांगला रिसर्च करण्याचा सल्ला देखील दिला जातो. भारतात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना, त्याच्याशी संबंधित टॅक्स नियमांची देखील जाणीव ठेवा.

निश्चल शेट्टी काय म्हणतात जाणून घ्या
निश्चल शेट्टी म्हणतात की,”क्रिप्टो मार्केटमध्ये 1 वर्षात 900% पर्यंत वाढ झाली आहे. त्याचे ट्रेडिंग व्हॉल्यूम जवळजवळ 1000% वाढले आहे. क्रिप्टोच्या रेग्युलेशन बाबतच्या सकारात्मक बातम्यांनी याला सपोर्ट दिला आहे. जागतिक स्तरावर क्रिप्टोशी संबंधित अनेक सकारात्मक बातम्या आल्याने भारतातही त्याकडे कल वाढला आहे.”

निश्चल शेट्टी पुढे म्हणाले की,” जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. बड्या कंपन्यांनी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांचा त्यावरील विश्वास वाढला आहे. मात्र, नवीन बाजारपेठ असल्याने त्यात उच्च अस्थिरता आहे. त्याच्या रेग्युलेशन बाबत भारतातून आणि जगभरातून सकारात्मक बातम्या येत आहेत. मात्र, जागतिक स्तरावर त्याचे रेग्युलेशन अद्याप पहिल्या टप्प्यातच आहे. म्हणूनच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, त्याबद्दल एक्सचेंजशी संबंधित संपूर्ण रिसर्च करा. भारतातील एक्सचेंजेसने एकत्रितपणे सेल्फ रेग्युलेशन केले आहे, मात्र क्रिप्टोबाबत सरकारकडून रेग्युलेशन असणे खूप महत्वाचे आहे.”

आशिष सिंघल काय म्हणतात जाणून घ्या
आशिष सिंघल म्हणाले की,” CoinSwitch चे केवळ 16 महिन्यांत 1.2 कोटी युझर्स आहेत. विशेष बाब म्हणजे बरेच युजर्स टियर-2 आणि टियर-3 शहरांशी जोडलेले आहेत. क्रिप्टो केवळ भारतातच नाही तर जगभरात खूप लोकप्रिय आहे. जगभरातील लोकं भारताकडे बघत आहेत. भारतातील सरकारकडून लवकरच काही नियमावली येणे अपेक्षित आहे. भारतात क्रिप्टोला मान्यता मिळाल्यास सरकारला मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळेल.”

विनाश शेखर काय म्हणाले जाणून घ्या
अविनाश शेखर म्हणतात की,” भारतात गेल्या 1 वर्षात क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये 8-10 पट वाढ झाली आहे. भारतातील क्रिप्टो मार्केट अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि पुढील 1 वर्षात वाढ आणखी वेगवान होईल अशी अपेक्षा आहे. भारतात क्रिप्टोच्या ट्रेडिंगसाठी अनेक एक्सचेंजेस आहेत. भारताच्या क्रिप्टो एक्सचेंजमध्ये गुंतवणूक येत आहे. सरकारने क्रिप्टोचे रेग्युलेशन केल्यास एक्सचेंजमधील गुंतवणूक आणखी वाढेल.”

क्रिप्टो हाय रिटर्न कॅटेगिरीमध्ये येते
या संभाषणात निश्चल शेट्टी पुढे म्हणाले की,”क्रिप्टो हा उच्च जोखीम, हाय रिटर्न कॅटेगिरीमध्ये येतो. लोकं क्रिप्टोमध्ये 5-10% गुंतवणूक करतात. क्रिप्टोच्या एकूण गुंतवणुकीपैकी 40-50% बिटकॉइन्समध्ये आहे. दुसऱ्या कॅटेगिरीमधील टोकनमध्ये 25% पर्यंत गुंतवणूक केली जाते. नवीन लाँच केलेल्या टोकन्समध्ये 25% पर्यंत गुंतवणूक शिल्लक आहे. DeFi आणि NFT भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींची भर पडल्याने वेगाने वाढ होण्याची आशा आहे. NFT भारतात अगदी सुरुवातीच्या काळात खूप लोकप्रिय झाले आहे.”

अविनाश शेखर सांगतात की,” एक्सचेंज, नवीन टोकन यासाठी रेग्युलेशन आवश्यक आहे. रेग्युलेशन सुरू झाल्यामुळे, क्रिप्टो मार्केटच्या वाढीला वेग येईल.”

Leave a Comment