Diwali 2022: दिवाळीत चुकूनही करू नका ‘हि’ कामे; अन्यथा लक्ष्मी होईल नाराज..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभर सध्या दिवाळीचा (Diwali 2022) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिपावलीला अतिशय शुभ मानले जाते. या सणादरम्यान लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी राहते असे हिंदू धर्मात समजले जाते. त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, जे तुम्ही चुकूनही दिवाळीत करू नये. असे केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होऊ शकते.

कोणालाही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका
दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या घरी कोणी भिकारी काही मागायला आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. त्याला काहीतरी द्या.

जुगार खेळू नका
दिवाळीच्या दिवशी अनेकजण जुगार खेळतात. लक्ष्मी हवी असेल तर चुकूनही जुगाराला हात लावू नका.

व्यसन करू नका
दिवाळीच्या संपूर्ण दिवसात कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका. ना पूजेपूर्वी ना पूजेनंतर.

भांडण करू नका
अनेकदा सणासुदीलाही काही लोक काही कारणांवरून वाद घालतात. पण दिवाळीच्या दिवशी असे करणे टाळा. यामुळे तुमचे मन शांत राहील आणि माँ लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल.

भेदभाव करू नका
दिवाळीच्या दिवशी भेटवस्तू देताना कुटुंबातील सदस्यांमध्ये भेदभाव करू नका. यामुळे माता लक्ष्मीला राग येऊ शकतो.