पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात Hardik Pandya ने केली ‘हि’ कामगिरी, ठरला पहिला भारतीय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना पार पडला. या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत थरार पाहायला मिळाला. या सामन्यात मोठा थरार पाहायला मिळाला. हा सामना भारताच्या हातातून निसटला असे वाटत असताना भारतीय संघाच्या मदतीला विराट कोहली व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांची जोडी धावून आली. या सामन्यात हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

हार्दिकने केली अष्टपैलू कामगिरी
या सामन्यादरम्यान हार्दिकने (Hardik Pandya) एक अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने T-20 सामन्यात 1000 प्लस धावा व 50 प्लस विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी नोंदवली.T-20 सामन्यात असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) अगोदर शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, ड्वेन ब्राव्हो, थिसारा परेरा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नबी, केव्हीन ओ’ब्रायन यांनी हा पराक्रम केला आहे.

शेवटच्या षटकात रंगला थरार
शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 16 रनची गरज होती. पहिल्याच बॉलला मोहम्मद नवाझने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आऊट केलं. यानंतर बॅटिंगला आलेल्या दिनेश कार्तिकने एक रन काढून विराटला स्ट्राईक दिला. तिसऱ्या बॉलला विराटने पुन्हा दोन रन काढले. पुढच्या बॉलला विराटने सिक्स मारला, अंपायरने हा नो बॉल दिला, त्यामुळे भारताला 7 रन आणि फ्री हिट मिळाला. पुढच्या 3 बॉलमध्ये भारताला विजयासाठी 6 रनची गरज होती. फ्री हिटच्या बॉलवर मोहम्मद नवाझने वाईड बॉल टाकला. चौथ्या बॉलला भारताला बाईजच्या 3 रन मिळाल्या. पण पुढच्याच बॉलला दिनेश कार्तिक स्टम्पिंग झाला. यानंतर बॅटिंगला आलेल्या अश्विनला नवाझने पुन्हा वाईड बॉल टाकला, त्यामुळे भारताला विजयासाठी 1 बॉलमध्ये 1 रनची गरज होती. अश्विनने मिड ऑफच्या वरून शॉट मारत भारताला विजय मिळवून दिला.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?