सातारा | दिवाळीनिमित्त मिळालेल्या सलग सुट्यांमुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन ठिकाणे बहरलेली आहेत. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या महाबळेश्वरसह तापोळा, बामणोली, कास, पाचगणी येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. तर सातारा जिल्ह्यातील अनेक गड- किल्यांवरही ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आलेले पहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात हिरव्यागार डोंगर दऱ्यातील मोठ- मोठ्या वृक्षांसोबत गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली येथे पर्यटकांनी गर्दी केली आहे. तर कोयना धरणाच्या बॅकवाॅटरमध्ये बोटींगचा आनंद घेण्यासाठी तापोळा, बामणोलीसह महाबळेश्वर येथील वेण्णालेकमध्ये घेतला जात आहे. तर सातारा, रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवरील उंच डोंगरावर घनदाट जंगलात असणारा शिवरायांचा वासोटा किल्ला, प्रतापगड, भैरवगड यासह जिल्ह्यातील छोटे- मोठे गड- किल्यांवर ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी गर्दी केली जात आहे. तसेच टेंट घेवून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा मनमुराद आनंदही घेतला जात आहे.