नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनामुळे सध्या चर्चेत असणार्या दिल्ली येथे एक स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली येथील इस्राईली दूतावासाजवळ येथे स्फोट झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीतील इस्राईली दूतावासाजवळ एक कमी क्षमतेचा स्फोट झाल्याची माहिती मिळाला आहे. स्फोटाचे स्वरूप अजून समजले नसून घटनास्थळी तुटलेल्या काचांचे तुकडे पडलेले आहेत. सध्या तरी या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
सुरक्षा यंत्रणा पुढील तपास करत आहेत. परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस बळाला पाचारण करण्यात आलं आहे.
#WATCH | Delhi Police team near the Israel Embassy where a low-intensity explosion happened.
Nature of explosion being ascertained. Some broken glasses at the spot. No injuries reported; further investigation underway pic.twitter.com/RphSggzeOa
— ANI (@ANI) January 29, 2021
A low-intensity explosion happened near the Israel Embassy in Delhi, nature of explosion being ascertained. Some broken glasses at spot. No injuries reported; further investigation underway pic.twitter.com/xqIllrCZOQ
— ANI (@ANI) January 29, 2021