हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी करण्यात येईल. दरवर्षी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी कुबेर देवता आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. तसेच घरामध्ये अनेक नवीन वस्तू आणल्या जातात. जास्त प्रमाणात धनत्रयोदशी दिवशी सोन्याची खरेदी करण्यात येते. परंतु अशा काही वस्तू देखील असतात, ज्या यादिवशी खरेदी करणे अशुभ मानले जाते. आज आपण याच वस्तू जाणून घेणार आहोत.
1) अॅल्युमिनियम, धारदार वस्तू – धनत्रयोदशी दिवशी ॲल्युमिनियम, धारदार वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू देखील खरेदी करू नयेत. असे म्हणतात की, अशा वस्तू घरात आणल्याने आर्थिक भरभराट होत नाही.
2) काचेच्या वस्तू – काचेच्या वस्तू या लगेच फुटणाऱ्या आणि तुटणाऱ्या असतात. त्यामुळे अशा शुभ दिवशी काचेच्या वस्तू घरात आणू नये. किंवा त्या आणायच्या जरी असल्या तरी त्या सणसमारंभ झाल्यानंतर घरात आणाव्यात.
3) काळ्या रंगाचे कापड – काळा रंग हा हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी काळा रंग घालणं किंवा घरात आणणे टाळावे. तसेच पूजेला बसल्यानंतर देखील काळी कपडे घालू नये.
4) लोखंडी भांडी – धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाची भांडी देखील खरेदी करू नयेत. तुम्ही जर अन्न शिजवण्यासाठी काही लोखंडाच्या वस्तू खरेदी करू इच्छित असाल तर त्या सण संपल्यानंतर खरेदी करावेत.
5) मातीची भांडी – मातीची भांडी ही खूप जपून वापरायची असतात. अशा भांड्यांना तडा गेला की लगेच त्या तुटतात. त्यामुळे सणासुदीमध्ये मातीची भांडी देखील खरेदी करू नये. अशी भांडी घरात असल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.