AC वापरताना ‘हा’ निष्काळजीपणा करू नका, अन्यथा मोठा स्फोट होण्याची शक्यता

AC Blast
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, सध्या उन्हाळ्याचे दिवस असून गर्मीपासून सुटका करण्यासाठी आपण पंखा, कुलर आणि AC चा वापर करतो. या तिन्ही मधील एअर कंडिशनर म्हणजेच एसी वापरणे शरीराला जितका गारवा देत तितकंच त्याचा वापर करणंही खूप धोक्याचे ठरू शकते. तुम्हाला माहिती आहे का एअर कंडिशनर निष्काळजीपणे हाताळणे खूप हानिकारक आहे. आणि या चुकीमुळे एअर कंडिशनर बॉम्ब एवढा खतरनाक बनून स्पोट होऊ शकतो. नेमकं एअर कंडिशनर मध्ये स्फोट कसा होतो आणि हे कशा पद्धतीने धोकादायक आहे हे आज आपण बघूया

एसी फुटण्याची कारणे?

एसी फुटणे हे सर्वसामान्य नसून अंत्यत गंभीर आहे. जर वीज पुरवठा योग्य प्रकारे होत नसेल तर एसीचा स्फोट होऊ शकतो. वीजपुरवठा खंडित होऊन काही वेळानंतर वीज परत आली किंवा लोडशेडिंगमुळे अशी दुर्घटना घडू शकते. उन्हाळ्यात जास्त उन्हामुळे एसी तापू शकतात. आणि त्यामुळे आग लागू शकते ज्यामुळे दबलेल्या वायूचा स्फोट होतो.

ओव्हरहिटिंगचे कारण काय ?

एसीच्या आतमध्ये असलेली कंडेन्सर कॉइल ही धूळ खात पडलेली असेल आणि त्याला काजळी लागलेली असेल, तर ओव्हर हीटिंग होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कामकाजादरम्यान निर्माण होणारी उष्णता बाहेर पडू शकत नसल्यामुळे जास्त गरम होते. त्याचबरोबर खराब दर्जाचे केबल आणि प्लगचा वापर हे शॉर्ट सर्किटचे खास कारण आहे.

AC सुरक्षित कसा ठेवायचा?

1. एअर फिल्टर स्वच्छ ठेऊन दररोज साफसफाईच्या करा.
2. AC युनिट स्थित आहे की नाही , त्याची एक बाजू बाहेरून प्रक्षेपित होईल आणि कंडेन्सेशन लवकर बाहेर पडेल. याची खात्री करा
3. वादळ असल्यास एसी अनप्लग करा.
4. शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी तारा नियमितपणे तपासा.