हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Insurance : आपल्या वाहनासाठी इन्शुरन्स पॉलिसी घेणे हे नेहमीच फायद्याचे ठरते. त्यामुळे नवीन वाहन घेतानाच त्याचा इन्शुरन्स काढायला हवा. त्याचप्रमाणे इन्शुरन्स जुना झाल्यावर त्याचे लवकरात लवकर रिन्यूअल देखील करावे. सध्या बाजारात अनेक इन्शुरन्स कंपन्या उपलब्ध आहेत. मात्र, प्रत्येक कंपन्यांच्या अटी वेगवेगळ्या असू शकतील. त्यामुळे इन्शुरन्स पॉलिसी घेताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरेल. असे न केल्यास इन्शुरन्स क्लेम मिळवण्यात अडचण येऊ शकेल. तर आजच्या या बातमीमध्ये आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्या इन्शुरन्स पॉलिसी घेताना उपयुक्त ठरतील.
अटी आणि नियम वाचा
इन्शुरन्ससाठी क्लेम करताना अनेकदा कंपन्यांकडून अशा काही गोष्टी उपस्थित करतात ज्यामुळे ग्राहकांना त्याचा पूर्ण लाभ मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत, इन्शुरन्स पॉलिसी घेताना आपल्या वाहनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्यामध्ये कव्हर होतील कि नाही ते तपासायला हवे. तसेच इन्शुरन्स पॉलिसीच्या अटी आणि नियम हे काळजीपूर्वक वाचायला हवेत. त्याचप्रमाणे, पॉलिसीचे रिन्यूअल करण्याआधी आपल्या सध्याच्या कंपनीच्या इन्शुरन्स कव्हरची तुलना इतर कंपनीशी करायला हवी. जेणेकरून कमी पैशात चांगल्या पॉलिसीचा लाभ मिळू शकेल. Car Insurance
वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसीची तुलना करा
जर आपण इन्शुरन्स पॉलिसी पहिल्यांदाच घेत असाल तर कोणत्याही कंपनीची निवडण्याआधी इतर कंपन्यांच्या पॉलिसीचे कोटेशन तपासा. आजकाल यासाठी अनेक थर्ड पार्टी अॅप्स देखील उपलब्ध आहेत. याच्या मदतीने वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसीची तुलना करता येऊ शकेल. काहीवेळा आपल्या वाहनाचे मूल्य आणि इन्शुरन्सचे प्रीमियम यामध्ये तफावत असू शकते. अशा प्रकारे एक चांगली पॉलिसी निवडता येईल. Car Insurance
क्लेम सेटलमेंट रेशो आठवणीने तपासा
इन्शुरन्ससाठी कंपनीची निवड करण्यापूर्वी, त्याचा क्लेम सेटलमेंट रेशो (CSR) पाहणे महत्वाचे आहे. याद्वारे त्या कंपनीने गेल्या एका वर्षात किती इन्शुरन्स क्लेम निकाली काढले आहेत हे कळून येईल. हे लक्षात घ्या कि, एका वर्षामध्ये जास्तीत जास्त CSR सेटल करणारी कंपनी निवडणे फायदेशीर ठरेल. यामुळे, कलमे मिळण्याची शक्यता वाढते. याशिवाय पॉलिसीचे रिन्यूअल करताना नेहमी योग्य माहिती द्या. यामुळे क्लेमच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही. Car Insurance
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.tataaig.com/motor-insurance/car-insurance
हे पण वाचा :
Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या
एप्रिलपासून Life Insurance पॉलिसी महागणार, जाणून घ्या यामागील कारणे
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक व्याजदर, तपासा लिस्ट
Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल दुप्पट टॅक्स, जाणून घ्या त्याबाबतचा नियम
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल