हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) च्या खातेधारकांना बँकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आजकाल बनावट कॉलच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, तुम्हाला अशा घटना टाळायच्या असतील तर +91-8294710946 आणि +91-7362951973 नंबरवरून येणारे कॉल्स उचलू नका अशी स्पष्ट सूचना बँकेने आपल्या ग्राहकांना दिली आहे
SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करून खातेधारकांना हा इशारा दिला आहे. फिशिंग स्कैम असलेल्या नंबर वरून फोन उचलू नका असे आवाहन बँकेने केले आहे. बँक केवळ कॉलवरच नव्हे तर एसएमएस, ईमेल इत्यादींवरील अशा लिंक्सपासून सावध राहण्यास सांगत आहे.
Do not engage with these numbers, & don't click on #phishing links for KYC updates as they aren't associated with SBI. #BeAlert & #SafeWithSBI https://t.co/47tG8l03aH
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 20, 2022
बँकेने म्हटले आहे की जर पिन, सीव्हीव्ही किंवा ओटीपी सारख्या वैयक्तिक गोष्टी तुमच्याकडून विचारल्या गेल्या तर अशा कोणत्याही लिंकला उत्तर देऊ नका कारण बँक तुमच्याकडून ही माहिती कधीच विचारत नाही, असे SBI ने म्हटले आहे. तसेच आपल्याला अशा कोणत्याही फिशिंग घटनेची तक्रार करायची असेल तर [email protected] वर करण्यास सांगितले आहे.