तुम्ही सुद्धा घाईघाईत जेवता? ‘हे’ दुष्परिणाम पहाच

fast eating (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे दगदगीचे जीवन आणि धावपळ यामुळे काही जणांना जेवण करायला सुद्धा वेळ नसतो. अनेक जण तर घाईघाईत जेवण करत आपला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतात. बरेचजण तर खाण्याला दुय्यम महत्त्व देत कामाच्या वेळी किंवा घाई-गडबडीत भराभर खाऊन मोकळे होतात. पण तुम्हाला माहित आहे का? घाईघाईत जेवण करणं आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. अशामुळे आपणास विविध समस्यांना सामोरे जावं लागत. चला याबाबतच जाणून घेऊया..

जर तुम्ही घाईघाईने अन्न खाल्ले किंवा ते चघळण्याऐवजी गिळल्यास पचनक्रिया बिघडू शकते. अशा वेळी छातीत जळजळ, अपचन आणि गॅस सारख्या समस्या होण्याची शक्यता असते.

घाईघाईत जेवण केल्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया नीट होत नाही. ज्यामुळे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे आपल्या हृदयावर तणाव येतो

घाईघाईत जेवणाऱ्या लोकांना मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता असते. याचं कारण म्हणजे खूप वेळा अन्न नीट चावले नाही तर रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते. जलद खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो आणि रक्तातील ग्लुकोज वाढते. यासाठी वेळीच घाईघाईत जेवण्याची सवय बदला आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा.

घाईघाईत जेवण केल्यामूळे आपण किती जेवलो याचा अंदाज येत नाही. यामुळे अतिप्रमाणात भोजन होऊन वजन वाढण्याची किंवा लठ्ठपणा निर्माण होण्याची शक्यता आहे.

भरभर जेवण्याच्या सवयीमुळे आपल्याला पोटदुखीचा आजार होऊ शकतो. पोटात गॅस तयार होतो, पोट फुगते आणि पोट दुखायला लागते.