तुमचाही सतत पाय दुखतोय?? ‘हे’ उपाय करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाइन । आपले दोन्ही पाय आपल्या शरीराचे महत्त्वाचा भाग आहे. पायांवरच आपण उभा राहत असतो. पाय चांगले आणि व्यावस्थित असतात तरच आपण चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकतो. त्यामुळे पायांची विशेष काळजी घेणं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. सध्याच्या दगदगीच्या काळात धावपळ होणे, कधी कधी एकाच जागी उभं राहणे , खूप वेळ चालणे यामुळे आपले पाय दुखतात. यासाठी आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जाणून घेऊया सतत पाय दुखण्याची मुख्य कारणे….

पाय दुखण्याची कारणे-

चुकीची चप्पल निवडणे
वाढलेले वजन
एका जागी खूप वेळ उभं राहणे
जास्त वेळ चालणे
जिन्यावरून सतत वर खाली करणे
आहारात कॅल्शिअमची कमी असणे

पाय दुखल्यावर घरगुती उपाय-

जर रोज तुमचे पाय दुखत असतील तर त्यातून सुटका करण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पायांना मोहरीचे तेल लावून मसाज करा. यामुळे तुमचे पाय दुखण्याचा त्रास कमी होऊ शकतो.

पाय दुखीवर लवंग तेल हे उत्तम औषधं आहे. लवंग तेलाची मालीशमुळे पायाला आराम मिळतो पायदुखी आणि थांबू शकते.

झोपताना पाय उशीवर थोडं वरच्या दिशेने ठेवल्यास तुमचे पाय दुखायचे थांबतील

पाय दुखत असल्यास गरम पाण्यात मीठ टाकावे आणि त्यात २० ते २५ मिनिटे पाय टाकून शेकून घ्यावे. यावेळी पाय दुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

शक्यतो संतुलित आहार घ्या. आहारात कॅल्शिअमची कमतरता असल्यानेही पाय दुखतात. त्यामुळे योग्य आहार घ्या.