हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मोबाईल म्हणजे अगदी जीव कि प्राण झाला आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड आहे. दिवसातून सरासरी ३-४ तास मोबाईल आपण वापरतोच. त्यातही आजकाल सर्वच टेलिकॉम कंपन्यांकडून दिवसाला भरगोस असा इंटरनेट डेटा देण्यात येत असून त्यामुळे अनेकजण त्यांचे इंटरनेट दिवस- रात्र चालूच ठेवतात. परंतु तुम्हाला माहित आहे का? मोबाईल डेटा ऑन ठेवणे चुकीचे नाही पण जेव्हा गरज असेल तेव्हाच तो सुरु करणे योग्य आहे. नाहीतर मोबाईलचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. चला आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की मोबाईल डाटा सतत व ठेवल्याने नेमका काय तोटा होऊ शकतो.
1) बॅटरीवर परिणाम
मोबाईलचा डाटा ऑन ठेवल्याने सर्वात मोठा परिणाम त्याच्या बॅटरीवर होतो. डेटा ऑन असल्याने तुमचा मोबाइल सतत कार्यरत राहतो, त्यामुळे उगीचच बॅटरी खर्च होते. आणि मोबाईल वापरत नसतानाही बॅटरी संपते.
2) चार्जिंग स्लो होते –
मोबाईलचा डेटा ऑन ठेवून चार्जिंग केल्यास मोबाईलचे चार्जिंग तर स्लो होतेच याशिवाय मोबाईल गरमही होतो. त्यामुळे मोबाईलची बॅटरी लाइफही खूप कमी होते. त्यामुळे मोबाईल चार्ज करत असताना डेटा सुरु ठेवणं धोकादायक ठरत.
3) हँग होण्याची शक्यता –
कोणतीही इलेक्टोनिक वस्तू किंवा सिस्टम काम केल्यानंतर, त्याला काही काळ ब्रेक देणे आवश्यक आहे. मात्र मोबाईलच्या अतिवापरामुळे तो सतत व्यस्त राहतो. अशा स्थितीत मोबाइलमधील अनेक अॅप्स, ब्राउझर, ऑनलाइन प्रोग्राम्स, डाऊनलोडिंग, सोशल साइट्स इत्यादी अँप सतत ऍक्टिव्ह राहतात आणि डेटा व असल्याने या सर्व सर्व्हिस रनिंग मध्ये दाखवतात. त्यामुळे तुमचा मोबाईल हँग होण्याची शक्यता वाढते.