हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या देशात फळे खाणे हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं मानलं जाते. फळे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. फळांमुळे आपल्याला तंदुरुस्ती आणि उत्तम आरोग्य लाभते. अशाच एका फळाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या आरोग्याला भरपूर फायदे होऊ शकतात. होय, या फळाचे नाव आहे किवी. ऐकायला थोडं वेगळं वाटतं असलं तरी याचे फायदे ऐकून तुम्ही नक्कीच या फळाचे सेवन कराल.
किवी फळाचे आरोग्यदायी फायदे-
किवीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे, आपल्या शरिराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यासोबतच किवीमध्ये Proteolytic Enzyme आढळते. जे पचनाच्या वेळी मदत करते.
किवीमध्ये संत्र आणि लिंबू या दोन्ही फळांपेक्षा अधिक प्रमाणात विटामिन सी असतं. त्यामुळे हेल्थ एक्स्पर्टदेखील डाएट फॉलो करताना रोज त्यामध्ये किवीचा समावेश करण्याचा सल्ला देतात. 100 ग्रॅम किवीत 154 टक्के व्हिटामिन C चे प्रमाण आढळते . व्हिटामिन C आपल्या शरीरात अॅंटी आॅक्सीडेंट च्या रूपात काम करतं आणि आपल्या शरीराला कॅंसर सारख्या भयंकर रोगापासुन वाचवते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी किवी हे फळ खूप चांगले मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या फळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यामुळे डायबिटीज असणारे देखील किवी खाउ शकतात.
किवीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे आपल्या शरिराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात मदत होते . तसंच शरीरामध्ये होणाऱ्या इन्फेक्शनपासून वाचण्यासदेखील याची आपल्याला मदत होते. किवीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती एवढी सुधारते की सर्दी आणि फ्लूसारखे आजार आपल्यापासून दूर पळू शकतात.
झोप न येण्याच्या समस्येवर किवी एक चांगला उपाय आहे. किवी खाल्ल्याने सेरोटोनिन वाढवणारी रसायने सक्रिय होतात, ज्यामुळे कुठल्याही व्यत्ययाशिवाय तुम्ही गाढ झोप घेउ शकता.