हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवरा बायको मध्ये वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु ही कथा थेट व्हिडिओमध्ये घडल्यास ती व्हायरल होऊ न होणे शक्यच नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विशेष गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये देशातील एक प्रसिद्ध डॉक्टर दिसत आहे. प्रसिद्ध डॉक्टर आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष केके अग्रवाल यांनी पत्नी विना कोरोना वॅक्सीन घेतल्याची चूक केली आणि त्यानंतर जे झालं ते सोशल मीडियावर व्हायरल झालंय. . ज्यात त्यांची पत्नी त्यांची वॅक्सीनवरून शाळा घेत असल्याचे ऐकायला मिळते.
एकटेच कोरोना वॅक्सीन घेऊन आल्यानंतर डॉक्टर केके अग्रवाल यांनी लाइव्ह सेशन दरम्यान पत्नीचा फोन उचलून चूक केली. दरम्यान पत्नी जे काही म्हणाली ते लाइव्ह सेशनमध्ये रेकॉर्ड झालं आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, डॉक्टर अग्रवाल हे कारमध्ये बसले आहेत आणि ते लाइव्ह सेशनमध्ये आहेत. तेव्हाच त्यांच्या पत्नीचा फोन येतो आणि त्या विचारतात की, तुम्ही वॅक्सीन घ्यायला गेले होते का? यावर डॉक्टर सांगतात की, मी माहिती घ्यायला गेलो होतो, तर त्यांनी सांगितले आता कुणी नाही तर घ्या. म्हणून मी वॅक्सीन घेतली’.
Doctor KK Agarwal got himself vaccinated without his wife.
Note to self : don't ever pick-up phone while you are live on tv 🙂
#forwarded. pic.twitter.com/uhIQYvZ4IO— Tarun Shukla (@shukla_tarun) January 27, 2021
डॉक्टरांनी इतकंच सांगितलं की, त्यांनी वॅक्सीन घेतली. हे ऐकताच त्यांच्या पत्नीचा पारा चढतो आणि त्या त्यांना विचारतात की, ते त्यांना सोबत नेऊ शकत नव्हते का? यावर डॉक्टर सांगतात की, त्यांना सोमवारी वॅक्सीन दिली जाईल. पण त्यांच्या पत्नीचा पारा आणखी चढतो. त्या म्हणतात की, ‘फार विचित्र आहात तुम्ही, आम्हाला सोबत का घेऊन गेले नाहीत? तुम्ही मला तुमच्यासोबत का नेलं नाही?’.
डॉक्टर अग्रवाल पुन्हा नाराज पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करतात की, मी फक्त माहिती घ्यायला गेलो होतो आणि त्यांनी वॅक्सीन देण्यात आली. यावर त्यांची पत्नी म्हणते की, ‘कारणं नका सांगू, माझ्याशी खोटं बोलू नका’. तेव्हा डॉक्टरांना लक्षात येतं की ते लाइव्ह सेशनमध्ये आहेत. ते म्हणतात, ‘मी लाइव्ह आहे. नंतर बोलतो’. यावर त्यांची पत्नी तिकडून उत्तर देते की, ‘मी आताच लाइव्ह येऊन तुमची ऐशीतैशी करते’.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’