हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Return : आता मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी ई-फायलिंग पोर्टलवर ITR भरता येईल. ई-फायलिंग पोर्टलवर ITR ऑनलाइन भरताना ITR फॉर्म-1 आणि ITR फॉर्म-4 या दोनपैकी कोणताही एक फॉर्म निवडण्याचा पर्याय मिळतो. या दोन फॉर्म पैकी आपल्याला एक निवडावा लागेल.
हे लक्षात घ्या कि, ITR फॉर्म-1 ला सहज म्हणून देखील ओळखले जाते. बहुतेक करदाते याच फॉर्मचा वापर करून आपले टॅक्स भरतात. या फॉर्ममधील बहुतांश माहिती आधीपासूनच भरलेली असते जी करदात्याला व्हेरिफाय करावी लागते. तसेच याव्यतिरिक्त काही चुकीची माहिती टाकली असेल तर ती दुरुस्त देखील करावी लागेल. Income Tax Return
ITR साठी कोण-कोणती कागदपत्रे द्यावी लागतात ???
ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर दाखल करण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, बँक अकाउंट डिटेल्स, इन्व्हेस्टमेंट डिटेल्स आणि पुरावे तसेच इतर उत्पन्नाचे पुरावे असणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन आणि आधार लिंकही करावे लागेल. तसेच करदात्याचा ई-मेल आयडी देखील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे रजिस्टर्ड केलेला असावा. Income Tax Return
ITR-1 फॉर्म कोण भरू शकेल ???
ज्या लोकांचे पगार, मालमत्ता, व्याज आणि कृषी उत्पन्न यासह एकूण उत्पन्न 50 लाखांपर्यंत आहे त्यांना हा फॉर्म भरावा लागेल. यामध्ये पगारातून मिळणारे उत्पन्न, घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न, व्याजातून मिळणारे उत्पन्न, लाभांशातून मिळणारे उत्पन्न याची माहिती त्यामध्ये जाहीर करावी लागेल. Income Tax Return
ITR फॉर्म-4 कोण भरू शकेल ???
जर आपण पर्सनल, HUF आणि फर्म (LLP व्यतिरिक्त) असाल आणि आपले वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुमचे उत्पन्न कलम 44AD, 44ADA किंवा 44AE मधील कॅल्क्युलेशन नुसार प्रोफेशन आणि व्यवसायातून असेल, तर आपल्याला ITR फॉर्म-4 निवडून तुमचा आयटीआर भरावा लागेल. Income Tax Return
गेल्या आर्थिक वर्षाचा ITR दाखल करण्याची शेवटची तारीख
2021-22 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. त्याच वेळी, ज्यांच्या व्यवसायाला ऑडिट आवश्यक आहे ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतील. जर करदात्याने कोणताही निर्दिष्ट विदेशी किंवा देशांतर्गत व्यवहार केला असेल तर तो 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतो. Income Tax Return
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/
हे पण वाचा :
अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4 वर्षात दिला 17 पट नफा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घट, आजचे दर तपासा
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळेल जास्त रिटर्न !!!
FD Rates : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीनदर तपासा
Personal Finance : आर्थिक व्यवहारांशी संबंधित ‘या’ नियमांमध्ये 1जुलैपासून होणार बदल !!!