जम्मू | आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असून लष्करात देखील योग दिन साजरा केला जात आहे. निरोगी राहण्यासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तसेच भारताचा हा ऐतिहासिक खजिना जगाने स्वीकारला हि भारतासाठी सन्मान आणि अभिमानाची बाब आहे. त्यामुळेच भारतीय जवान देखील योग साधना करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.
सीमा सुरक्षा बलाच्या श्वान पथकातील कुत्र्यांनी देखील जवानांसोबत योगा केला आहे. त्याचे वृत्त एएनआय वृत्त संस्थेने दिले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवर या संदर्भातील व्हिडीओ देखील प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओ मध्ये सीमा सुरक्षा बलाच्या जवानांसोबत श्वान पथकातील कुत्री सुद्धा अगदी तंतोतंत माणसाप्रमाणे योग साधना करत असल्याचे दिसते आहे.
#WATCH Dog squad of Border Security Force performs yoga along with their trainers on #YogaDay2019 in Jammu. pic.twitter.com/TTN2vAgbeS
— ANI (@ANI) June 21, 2019
दरम्यान आज सर्वच स्तरातून योग दिन साजरा केला जात आहे. योग गुरु रामदेव बाबा यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत योग दिन साजरा केला. तर दिल्लीत देखील केंद्र सरकारच्या वतीने योगदिन साजरा करण्यात आला आहे. एकंदरच सरकारच्या विविध घटकांनी योग साधना करून आज योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.