ठाणे प्रतिनिधी| डोंबिवलीत आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात बिल्डर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात भाजपचा पदाधिकारी जबर जखमी झाला. तर या धुमश्चक्रीत नगरसेवकाचा भाऊ थोडक्यात बचावला. योगेश तळेकर असे जखमी पदाधिकाऱ्याच नाव आहे. जखमी तळेकर हे आजदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत.
तळेकर यांचा दिनेश राणे या बिल्डरबरोबर यापूर्वी 27 लाखांचा व्यवहार झाला होता. बिल्डर राणे हा तळेकर यांचा मित्र असल्यान त्यांनी राणे यांना ही रक्कम विश्वासान उसनी दिली होती. सदरची रक्कम तळेकर यांनी थोडे थोडे करून बिल्डर राणे याला दिली होती. वारंवार पैसे मागूनही बिल्डर राणे हा पैसे देत नव्हता. त्या बदल्यात राणे याने कल्याण-शिळ मार्गावरील दावडी गावात असलेल्या त्याच्या इमारतीत २ रूम देतो. अशी कबुली दिली होती. तसे करारनामे देखील करण्यात आले होते. मात्र, तरीही बिल्डर राणे हा पैसे आणि रूम देण्यास टाळाटाळ करत होता.
याबद्दल योगेश तळेकर याने त्यांना जाब विचारला असता दोन-चार जणांनी त्यांना जखडून ठेवल आणि इतरांनी त्याच्यावर हल्ला चढविला. हल्लेखोरांकडे तलवारी, चॉपर सारखी हत्यारे होती. सशस्त्र हल्ल्यात तळेकर यांच्यावर डोक्यावर वार झाले. मात्र, त्यांच्या सोबत असलेला गणेश काळण हा बचावला.