Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट; संपूर्ण परिसरात आगीचे तांडव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dombivli MIDC Blast: डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिनव शाळेजवळ एमआयडीसीतील कारखान्याचा आग लागल्याची माहिती मिळतेय. या वेळी झालेल्या स्फोटांच्या प्रचंड आवाजामुळे डोंबिवलीकरांचा काळजाचा ठोका चुकला. दूरपर्यंत धुरांचे लोट दिसून आले. विशेष गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयडीसीमध्ये आग लागली होती. यानंतर आता पुन्हा एकदा एका कारखान्याला आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

कोणत्या कंपनीत आग लागली ? Dombivli MIDC Blast

याबाबत अधिक माहिती अशी कि, डोंबिवलीतील एमआयडीत इंडो-अमाईन्स ही कंपनी आहे. या कंपनीत पेस्टीसाईड्स बनवले जातात. याच कंपनीत आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीत कंपनीचे तीन प्लॅन्ट जळून खाक (Dombivli MIDC Blast) झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण, बदलापूर, उल्हासनगरमधून अग्नीशनम दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. परंतु दोन तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळाले नाही. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आग एवढी भीषण आहे की, आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. भीतीमुळे या ठिकाणी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे.

संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप –

या भीषण आगीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एमआयडीसीमध्ये बेकादेशीर कामे सुरू आहेत. पोलिसांपासून शिंदेंच्या लोकांपर्यंत लाखो करोडोंचे हफ्ते कसे जातात. डोंबिवलीतील कंपन्यांमधून शिंदे गटाचे लोक किती हप्ते वसूल करतात हे आधी बघा. या ज्या घटना होतायत त्यांच्याकडे लक्ष द्या असं संजय राऊतांनी म्हंटल.