नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात साम्य तरी काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काल सोमवारी भारतात आगमन झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यासाठी आलेल्या ट्रम्प यांचे अहमदाबादमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत मोटेरा स्टेडियम येथे नमस्ते ट्रम्प हा रंगारंग कार्यक्रम पार पडला. यावेळी आपल्यात फारच घनिष्ट मैत्री असल्याचे डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींनी उपस्थित जनसागराला अगदी निक्षून सांगितले. बघायला गेलं तर राजकीय पटलावर दोघेही एकाच शैलीचे राजकारण करण्यासाठी ओळखले जातात. मात्र, सत्तेच्या शिखरावर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास हा तसा भिन्नच होता. अमेरिकेतील एका प्रॉपर्टी टायकूनच्या घरी डोनाल्ड ट्रम्प जन्माला झाला, तर नरेंद मोदी हे एका अत्यंत गरिब कुटुंब असलेल्या एका चहा वाल्याच्या घारी जन्माला आले. अशा भिन्न पार्श्वभूमीतून आलेल्या या दोघां नेत्यांमध्ये राजकारणापलीकडे बरेच साम्य आहे. यावरच एक कटाक्ष टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट…

डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हापासून सत्ता स्थापन केली आहे, तेव्हापासून यांच्या दोघांमधील संबंध हा चर्चेचा विषय ठरला आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014 तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 मध्ये सत्ता स्थापन केली आहे. तेव्हापासून या दोघांमधील संबंधाने लोकप्रियता मिळवली आहे. राष्ट्रपती ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची लोकप्रियता त्यांच्या रॅली आणि जनसभांमध्ये दिसून येते. अपार गर्दीला संबोधित करताना दोन्ही देशातील नेते प्रेक्षकांना आकर्षित करुन सोडतात.

अमेरिका फर्स्ट आणि मेक इन इंडिया

दोन्ही देशातील नेते राष्ट्रवाद आणि व्यापाराला नवीन उंचावर नेण्याची ग्वाही देतात. ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिला होता तर नरेंद्र मोदी यांनी भारतात मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. तसेच दोन्ही नेते हे लोकशाही असलेल्या दोन मोठ्या देशांचे नेतृत्व करत आले आहे. भारताचे माजी राजनायिक राकेश सूद यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांमध्ये खुप साम्य आहे. दोन्ही नेते त्यांच्या त्यांच्या राजकीय विचारधाराने राज्य करत आले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापारावरुन अनेक वाद झाले असतानाही दोन्ही देश निरंतर एक दुस-याशी जुळून घेताना दिसत आहे.

राष्ट्रवाद निती आणि साम्य

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प राष्ट्रवाद आणि संरक्षण नितीला बळकटी देण्यासंबंधित प्रयत्नशील दिसून येतात. अमेरिकेमध्ये स्थलांतरित लोकांविरुद्ध कडक शासन ट्रम्प यांनी अवलंबले. तसेच मोदी यांनी भारतामध्ये घुसखोरांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. ट्रम्प यांच्या स्थलांतरित नागरिकांविरुद्ध धोरणाचा परिणाम हा मुस्लिस समाजावर पडला होता. तसेच काहीसे चित्र हे भारतामध्ये पाहायला मिळाले होते.

ट्रम्प यांनी नेहमी केले भारताचे समर्थन

अनेक अशा कारणांवरुन जेव्हा जेव्हा भारतावर टीका करण्यात आली, तेव्हा तेव्हा ट्रम्प यांनी भारताला साथ दिली आहे. काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या या निर्णयावर टीका करण्यात आली होती. मात्र ट्रम्प यांनी या निर्णयाचे स्वागत करत भारत सरकारच्या निर्णयाला समर्थन दर्शवले होते. अमेरिकेमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी हाऊडी मोदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर अहमदाबादमध्ये ट्रम्प यांच्यासाठी नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच या भारत दौ-याचा फायदा डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या देशात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये होणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांना आहे. अमेरिकेत भारतीय मतदार आहेत. त्यांच्यात गुजरात येथील राहिवाशांचा देखील समावेश आहे. त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी ट्रम्प यांनी भारत दौरा केला असल्याचा बोललं जात आहे. त्यामुळे हा दौरा ट्रम्प यांच्या पुढील राजकीय भवितव्य उजागर करण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचा मानला जातोयं.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.