हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्यासाठी गुजरातमधील अहमदाबाद आणि उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे जोरदार तयारी सुरू आहे. भारत दौऱ्यावर ट्रम्प यांच्यासमवेत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इव्हांका ट्रम्प आणि सून जेरेड कुशनेर असतील. जेरेड ह्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागारही आहेत. ट्रम्प परिवाराचे स्वागत करण्यासाठी अहमदाबाद शहराची जोरदार सजावट केली जात आहे. ट्रम्प यांनी अमेरिकन माध्यमांशी संवाद साधताना अनेक वेळा पुनरावृत्ती केली की भारत भेटीसाठी मी खूप उत्सुक आहे आणि अहमदाबादमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी सुमारे ७० लाख लोक जमा होत आहेत. आता काँग्रेसने याच मुद्द्याला रोजगाराशी जोडून ट्विटरवर मोदी सरकारची खिल्ली उडवली आहे.
काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर नोकरीसाठीची एक जाहिरात पोस्ट केली आहे. या जाहिरातीत वरच्या बाजूला ठळक अक्षरात ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’ असं लिहिलेलं आहे. नोकरीच्या स्वरूपाबाबत लिहलं आहे, ‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पकडे बघून हात हलवित अभिवादन करणे.’ पदांची संख्या ६९ लाख. तर पगार म्हणून ‘अच्छे दिन’ देण्याचे म्हटले आहे. तारीख, वेळ आणि ठिकाण २४ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १२ वाजता मोटेरा स्टेडियम असा उल्लेख या जाहिरातीत केला गेला आहे. एवढेच नव्हे तर ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ”मोदीजींच्या २ कोटी रोजगार देण्याच्या घोषणेपैकी ६९ लाख रोजगार जाहीर केले आहेत. तेव्हा लवकरच अर्ज करा.” काँग्रेसने या पोस्टमधून मोदी सरकारवर टीकेसोबतच, गांधीगिरी मार्गाने त्यांना चिमटा काढण्याचा प्रयन्त केला आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला अहमदाबादला पोचतील. पंतप्रधान मोदी तेथे त्यांचे स्वागत करतील. मोदी आणि ट्रम्प संयुक्तरित्या विमानतळापासून ते मोटेरा स्टेडियमपर्यंत रोड शो करतील. यानंतर नव्यानं नूतनीकरण केलेल्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून मोटेरा स्टेडियमचे उद्घाटना ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे. याच ठिकाणी ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रमही होईल. या कार्यक्रमानंतर ट्रम्प त्याच दिवशी आपल्या कुटुंबासमवेत आग्राला रवाना होतील. आग्रामध्ये ते ताजमहालला भेट देणार आहेत. तर दुसर्याच दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी दिल्लीत इतर पाहुण्यांची भेट घेतील. मेलेनिया ट्रम्प दिल्लीच्या सरकारी शाळांना भेट देणार आहेत. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेदेखील मेलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमात सामील होते, पण आता त्यांचे नाव या यादीतून हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
69 lakh vacancies of the 2 cr promised by Modiji have been announced. Apply now. Hurry! #Jumla7MillionKa pic.twitter.com/4jA27gQL16
— Congress (@INCIndia) February 22, 2020
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.