औरंगाबाद । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय समूहाच्या ‘सीएसआर’ विभागाच्या वतीने देशाच्या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने १४ राज्यांतील ६० जिल्ह्यांमध्ये शंभरपेक्षा जास्त डायलिसिस मशीनची देणगी दिली जाणार आहे. यामध्ये औरंगाबादसह राज्यातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
आयसीआयसीआय फाउंडेशनतर्फे ही उपकरणे विविध रुग्णालयांना मोफत पुरवली जाणार आहेत. या उपकरणांवर चार वर्षांची वॉरंटी देण्यात आली असून, त्यामुळे डायलिसिस केंद्रांच्या कामकाजात अडथळे येणार नाहीत. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
आयसीआयसीआय फाउंडेशनचे अध्यक्ष सौरभ सिंग म्हणाले, फाउंडेशनने सातत्याने नागरिकांचे स्वास्थ्य उंचावण्यासाठी काम केले आहे. यामुळे विविध जिल्ह्यांतील रुग्णांना त्यांच्या घराजवळच परवडणाऱ्या किंमतीत डायलिसिस उपचार उपलब्ध होतील आणि पर्यायाने वेळ व पैशांची बचत होईल. ज्या राज्यांत डायलिसिस मशीन कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, तिथे त्यांची उपलब्धता वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न आहेत. हा उपक्रम गरीबांना मोफत डायलिसिस सेवा पुरवणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत ‘प्रधान मंत्री नॅशनल डायलिसिस प्रोग्रॅम’चा भाग आहे, असेही सिंग यांनी कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou