तब्बल 1 कोटींचे दान : पतीची शेवटीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पंढरपूरच्या विठूरायाला पत्नीकडून देणगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर | दक्षिण काशी, गोरगरिबांचा देव म्हणून प्रसिद्ध असलेला पंढरीचा विठूरायाच्या चरणी एका महिला भक्ताने तब्बल 1 कोटी रुपये दान केले आहेत. मुंबईतील या भक्त असणाऱ्या महिलेच्या पतीचे काही दिवसापूर्वी कोरोनाने निधन झाले असून पतीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे दान दिले आहे. विठ्ठलभक्त पतीच्या निधनानंतर पत्नीने 1 कोटीची देणगी देत इच्छा पूर्ण केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दीड वर्षपासून भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या विठूरायच मंदिरही बंद आहे. यामुळे भाविक दर्शनासाठी येत नाहीत. त्यामुळे देणगीच्या रक्कमेत घट झालेली आहे. अशावेळी एका भाविकाने आपल्या लाडक्या विठूरायाच्या चरणी तब्बल 1 कोटीची देणगी दिली. या देणगीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

मुंबईतील एका विठ्ठल भक्ताचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंबाने विम्याची आलेली रक्कम आणि स्वताः जवळील पैसे या भक्ताच्या कुटुंबीयांनी विठ्ठलाच्या दान पेटीत अर्पण केले. इतकी मोठी रक्कम दान देऊन ही या भाविकांने आपले नाव मात्र गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर समितीला केली आहे.

Leave a Comment