सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पंडित ऑटोमोटिव्हची जागा आम्ही NCLT च्या लिलावातून विकत घेतली आहे. कामगारांच्या थकीत पगाराशी आमचा काही संबंध नाही. कामगारांनी बँक ऑफ बडोदा, NCLT यांच्याशी चर्चा करावी. आम्ही कायदेशीररित्या ही जागा घेतली असून माझ्याच प्रॉपर्टीमध्ये मला जाण्यास विरोध करणे हा गुन्हा आहे. आमदार म्हणून मी व्यवसाय करायचा नाही का? आम्ही इन्कम टॅक्स भरतोय ही चूक करतोय का? असा संतप्त सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.
सातारा एमआयडीसीत पंडित ऑटोमोटिव्हची जागा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खरेदी केली असून यास येथील कामगारांचा विरोध करत आहेत. आमदार शिवेंद्रराजे यांनी आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप येथील कामगारांनी केला आहे. कामगारा आपल्या कुटुंबातील सदस्यांसह कंपनीच्या गेटवर जमा झालेले होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आम्ही कंपनी मालकांकडून घेतलेली नाही. लिलावातून आम्ही जागा घेतली आहे. आमचा मालक म्हणून कामगारांशी कसलाही संबध येत नाही. आम्ही कोणताही बेकायदेशीर व्यवहार केलेला नाही. आम्ही रितसर मालक झालेलो आहोत. आम्ही कायदेशीरपणे व्यवसाय करत आहे, त्यामुळे आमदार म्हणून आम्ही व्यवसाय करायचा नाहीच का?