Tuesday, January 31, 2023

राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही; हिम्मत असेल तर समोर येऊन हल्ला करा – विजयराव साळवे

- Advertisement -

औरंगाबाद : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आज गुलमंडी येथे महागाई विरोधात निषेध आंदोलन केले. येवेळी त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आणि सोबतच भाजप सरकारवर राष्ट्रवादी कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजयराव साळवे यांनी टीका केली आहे.

यावेळी, हॅलो महारष्ट्राशी बोलताना असताना साळवे म्हणाले की, ‘केंद्र सरकार गेंड्याच्या कातड्याचा सरकार आहे. त्यांनी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस हे महाग करून सामान्य जनतेसमोर जगावे का मारावे असा प्रश्न निर्माण केला आहे. त्यांनी तात्काळ पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस यांच्या किमती कमी कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन राष्ट्रवादी करेल असा इशारा देण्यात आला’.

- Advertisement -

दरम्यान, ते म्हणाले की गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेला हल्ला करणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नव्हता. पण राष्ट्रवादी कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो. हिम्मत असेल तर समोर येऊन हल्ला करा. भ्याडपणा करू नका असेही ते म्हणले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलन दरम्यान उपस्थित होते.