Don’t Worry! भारताकडे ३ कोटी २८ लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारताकडे कोरोनासाठी लढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्सचा पुष्कळ साठा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. भारताकडे सध्या तब्बल ३ कोटी २८ लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्स आहेत. तर भारताची सध्याची गरज १ कोटी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्सची आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. काही वेळापूर्वी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य विभागाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

भारताने अमेरिका, इस्रायल, ब्राझील या देशांना नुकताच हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केला आहे. त्यामुळं भारत स्वतः कोरोनाच्या संकटात असताना इतर देशांना हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा का करत आहे? अशी विचारणा केंद्र सरकारला केली जात आहे. त्यावर आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देशातील हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधाच्या साठ्यासोबतच भारताची सध्या किती गरज आहे यावर आज स्पष्टीकरण दिलं. याचबरोबर भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ६ हजारांवर गेली असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दरम्यान, हायड्रॉक्सी क्लोरोक्विन औषधाचा पुरवठा केल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. त्यावर मोदींनीही त्यांना प्रतिसाद दिला आहे. या कठिण काळात भारत आणि ब्राझीलची मैत्री अधिक बळकट झाली आहे असे मोदींनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment