सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 666 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 120 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात झालेल्या चाचण्या आणि त्यामध्ये आलेल्या बाधितांचा पाॅझिटीव्हीटी रेट 8. 96 इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 741 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 97 हजार 523 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 82 हजार 670 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 482 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 32 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 8 हजार 437 जणांचे नमुने घेण्यात आले.
बाधितांचे प्रमाण कमी होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने जिल्ह्याची चिंताजनक परिस्थितीत पहायला मिळत आहे. तसेच दिवसभरात बाधितांचा मृत्यू संख्या दुप्पटीने वाढलेली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी 16 व 18 तर काल दिवसभरात तब्बल 32 मृत्यू झालेले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसातील मृत्यूपेक्षा शुक्रवारी दिवसभरात दुप्पट मृत्यू झाले.