डबल डेकर बस असेल ‘ओपन रुफ’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेने डबल डेकर बस ओपन ग्रुपच्या म्हणजे छत नसलेल्या घेण्याची तयारी सुरू केली आहे. या कामासाठी मुंबईच्या बेस्ट संस्थेची मदत घेतली जाणार आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने मागील काही दिवसांपासून ही बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. बस खरेदीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी डबल डेकर बस सुरू कराव्यात अशी सूचना केली. स्मार्ट सिटी ने सूचना मान्य करत भविष्यात डबल-डेकर बस खरेदी करण्याचा विचार सुरू केला आहे. बसेसला छतही राहणार नाही. त्यामुळे पर्यटकांना खुल्या बसमध्ये बसून संपूर्ण शहरभर मनसोक्तपणे फिरण्याचा आनंद घेता येईल.

यासंदर्भात स्मार्ट सिटी चे सीईओ असते कुमार पांडे यांनी सांगितले की, मुंबईत अशा पद्धतीचा प्रयोग बेस्टने केला आहे. महापालिका स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच मुंबईत बेस्टच्या कार्यपद्धतीची माहिती घेणार आहे. डबल-डेकर बसेसची सेवा सुरू करण्यासाठी बेस्टच्या संबंधित एजन्सीची सुद्धा मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Comment