आता मोबाईल नंबरशिवाय अशा प्रकारे डाउनलोड करा Aadhar Card, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

Aadhar Card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card सध्याच्या काळात एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. अगदी सिम मिळवण्यापासून ते पासपोर्ट मिळवण्यापर्यंत, तसेच बँक खाते उघडण्यापासून ते ITR दाखल करण्यापर्यंत आणि ड्रायव्हिंग लायसन्स (DL) मिळवण्यापासून ते पॅन कार्ड मिळवण्यापर्यंतच्या कामांसाठी अत्यावश्यक आहे. आपला मोबाईल नंबर आधारमध्ये रजिस्टर्ड असेल तर याद्वारे अनेक गोष्टी खूप सोप्या होतात. जर आपल्याला एखाद्या महत्वाच्या कामासाठी अचानक आधार कार्डची गरज भासली तर ते लगेच ऑनलाईन डाउनलोड करता येईल. मात्र जर आपला मोबाईल नंबर आधारशी लिंक केला नसेल तर अनेक कामे अडकू शकतील. मात्र यासाठी आता काळजी करण्याची काही गरज नाही. कारण आता आपल्याला मोबाईल नंबर आधारमध्ये रजिस्टर्ड केल्याशिवायही डाउनलोड करता येईल. चला तर त्यासाठीची प्रक्रिया जाणून घेउयात…

What Is Blue Aadhaar Card? How Can One Avail These Identity Cards | All You Need

UIDAI च्या अधिकृत वेबसाइट वरील माहितीनुसार, आता आपल्याला मोबाईल नंबर रजिस्टर्ड केल्याशिवाय Aadhar Card डाउनलोड करता येऊ शकेल. यासाठी आपल्याला UIDAI च्या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यासाठीची प्रक्रिया देखील खूप सोपी केली गेली आहे. तसेच ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांच्यासाठीही आधार सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Aadhaar Card Update: Change address in Aadhaar in few simple steps, here's how | Personal Finance News | Zee News

रजिस्टर्ड मोबाईल नंबर शिवाय अशा प्रकारे डाउनलोड करा Aadhar Card

1. सर्वांत आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in वर जा.
2. मेन पेजवरून ‘My Aadhaar’ मध्ये दिलेल्या ‘Order Aadhaar Reprint’ वर क्लिक करा.
3. इथे आपला 12 अंकी आधार नंबर किंवा 16 अंकी VIDN किंवा 28 अंकी एनरॉलमेंट आयडी एंटर करा. नंतर सिक्योरिटी कोड एंटर करा.
4. त्यानंतर ‘My Mobile number is not registered’ वर क्लिक करा.
5. नंतर तुमचा alternative number किंवा non-registered मोबाईल नंबर टाका.
6. त्यानंतर ‘Send OTP’ वर क्लिक करा आणि OTP एंटर केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
7. नंतर पेमेंट पर्याय निवडा. नंतर PDF डाउनलोड करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर सबमिट करा.
8. सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN) SMS द्वारे जनरेट केला जाईल. अशा प्रकारे स्टेटस ट्रॅक करता येईल.

New-look PVC Aadhaar card with enhanced features: Here's how you can get it | Business Standard News

नवीन PVC आधार कार्डसाठी अशा प्रकारे करा अर्ज

Aadhar Card ची सुरक्षितता लक्षात घेऊन UIDAI कडून Aadhaar PVC कार्ड लाँच केले आहे. आता कोणत्याही नागरिकाला प्राधिकरणाच्या वेबसाइटद्वारे नवीन PVC कार्ड मागवता येईल. तसेच नवीन PVC आधार कार्ड सोबत ठेवणे देखील खूप सोपे आहे.

हे पण वाचा :
FD Rates : देशातील 4 मोठ्या बँकांपैकी कोणत्या बँकेच्या FD वर सर्वोधिक व्याज मिळेल ते पहा
LIC कडून दोन लाईफ इन्शुरन्स प्लॅन बंद, आता आपल्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून 154 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठा बदल, पहा आजचे नवीन दर
Best Battery Backup Smartphone : दीर्घकाळ बॅटरी बॅकअप देणारे ‘हे’ 5 स्मार्टफोन, तपासा किंमत अन् फीचर्स