प्रबुद्ध भारत स्थापना दिवस | सुनिल शेवरे
साल १९२०. परिषद माणगाव. अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शाहू महाराज यांनी याच परिषदेत डॉ बाबासाहेबांचं भविष्य ओळ्खल होतं म्हणून त्यांनी अस्पृशांचा एकमेव पुढारी म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली आणि आपल्या डोक्यावरील फेटा बाबासाहेबांच्या डोक्यावर घातला. आपणच खऱ्या अर्थाने अस्पृश्यतेचे प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास मनात बिंबवणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू राजाने २९ वर्षीय बाबासाहेब यांच्यातील सुप्त गुण ओळखले होते.
अस्पृशांचे पुढारी डॉ बाबासाहेबांच्या काळा पूर्वीही होते त्यात प्रमुख नाव होती विठ्ठल रामजी शिंदे, गोपाल वलंगकर, सुभेदार रामजी मालोजी आंबवडेकर ( आंबेडकर ). बाबासाहेब लहान असताना कोणती तरी परिक्षा पास झाल्यावर त्यांचा सत्कार मुंबई च्या डबक चाळीत केला. तेंव्हा एका गुरुजींनी त्यांना बुद्ध चरित्र भेट म्हणून दिल होतं. त्या घटनेचा त्यांना आयुष्याच्या शेवट पर्यंत प्रभाव होता. म्हणून त्यांनी शेवटी आपल्या साप्ताहिकाचं नाव प्रबुद्ध भारत असं ठेवलं.
अस्पृशांची कैफियत मांडणार अनेक वर्षांचं जळजळीत वास्तव मांडण्यासाठी एक २९ वर्षीय युवक पुढे आला त्यांचं नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. अस्पृश्याचे चटके सहन करणाऱ्या समाजाबद्दल लिहिण्यासाठी त्यांचे हात सळसळत होते. परदेशी शिक्षणाचा त्यांनी आपल्या कार्यात वापर केला. त्यांनी अनेक पदव्या ग्रहण केल्या होत्या.
३१ जानेवारी १९२० साली त्यांनी मूकनायक नावाचं साप्ताहिक सुरु केलं. मुक्या लोकांचं प्रतिनिधीत्व करणार आणि वास्तव मांडणारा मूकनायक १९२० च्या दशकात अस्पृश्य समाजाचा आरसाच बनला होता. आपल्या हक्काची आपल्या सामाजिक जाणिवांची जाणीव करून देण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं आणि तिथून सुरु झालेला प्रवास १९२४ साली समता १९२९ साली जनता स्थापन केला. नंतर या साप्ताहीकाचं १९५४ साली नामकरण हे प्रबुद्ध भारत केलं.
बाबसाहेबांनी १९५४ साली प्रबुद्ध भारत ची स्थापन करताना बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्म नुकताच झाला होता. प्रबुद्ध भारत मधून बाबासाहेबांनी अनेक वेळा बौद्ध तत्वनाची सखोलपणे मीमांसा केली. बाबासाहेब ६ डिसें १९५६ ला गेल्यानन्तर अनेक वर्षे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी हे साप्ताहिक चालविले. त्यांच्यानंतर च्या काळात हे कार्य थंड पडलं आणि २०१६ साली बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी हे साप्ताहिक सुरु केले. डॉ बाबासाहेबांनी स्थापन केलेलं साप्ताहिक प्रबुद्ध भारत महाराष्ट्रात सर्वत्र प्रकाशित होतो. सध्या याचं कार्यालय पुण्यात आहे तर छपाई मुंबईत होते.
इतर महत्वाचे –
या कारणामूळे डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी आपले सकपाळ हे आडनाव बदलले…
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना या मराठी माणसाकडे सोपवायची होती रिपब्लिकन पक्षाची जबाबदारी