हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता काँग्रेसने केंद्र सरकार वर तोफ डागली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या स्थितीत राज्य सरकारनं सातत्याने केंद्राकडे लस आणि आर्थिक मदत मागितली जात आहे. मात्र, काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर आरोप केला त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असा आक्रमक पवित्रा नाना पटोले यांनी घेतलाय.
महाराष्ट्रासोबत सावत्र आईसारखी वागणूक का?
दरम्यान, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी ट्विट करुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रासोबत सावत्र आईसारखी वागणूक का? असा प्रश्न त्यांनी विचारलाय.
Why does Maharashtra get the step-motherly treatment from the central govt ?? Remember we are all Indian first !!! #MaharashtraNeedsVaccine #EqualityInVaccine @CMOMaharashtra @rajeshtope11 @MoHFW_INDIA https://t.co/ebp7iwH5bC
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) April 8, 2021
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page