Dream 11 Winner | Dream 11 ने फळफळले गवंडी कामगाराचे नशीब, एका रात्रीत झाला करोडपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dream 11 Winner | सध्या भारतामध्ये IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा चालू आहे. क्रिकेट प्रेमींसाठी IPL म्हणजे एका सणापेक्षा कमी नसते. या वर्षी IPL मध्ये मोठ्या प्रमाणात चुरस रंगलेली दिसत आहे आणि क्रिकेटप्रेमी देखील IPL रोज आनंद घेत आहे. IPL आली की सगळ्यांचे लक्ष ड्रीम 11 वर जातं. यावर अनेकजण टीम तयार करून पैसे जिंकत असतात. आज पर्यंत याचा फायदा अनेक लोकांना झालेला आहे तर अनेक लोकांचे यात नुकसानही झालेले आहे. परंतु काही मोजके लोक असे आहेत जे या Dream 11 मधून करोडपती झालेले आहे.

अशातच या Dream 11 (Dream 11 Winner) बाबत एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे Dream 11 च्या माध्यमातून एका गवंडी कामगाराचे नशीब चांगलेच चमकले आहे. या व्यक्तीचे नाव हरीश आर्य असे आहे. उत्तराखंड जिल्ह्यातील नैनीताल येथील तो रहिवासी आहे. या हरीश आर्य याने Dream 11 वर त्याची टीम लावली आणि यावर त्याने एक कोटी रुपये जिंकलेले आहेस..

हरीश आर्य हा उत्तराखंडमधील रहिवासी आहेत. तो व्यवसायाने गवंडी आहे. त्याचे वडील कैलास आर्य हे देखील गवंडी कामच करतात. हरीश याने सांगितले की, गेल्या सहा वर्षापासून तो Dream 11 वर टीम तयार करत आहे. या सोमवारी त्याने IPL च्या सामन्यात दरम्यान Dream 11वर त्याची टीम तयार केली आणि त्याचे नशीब चमकले. या सामना दरम्यान त्याने 1 कोटी रुपये जिंकले.

हे 1 कोटी (Dream 11 Winner) जिंकल्यानंतर त्याने सांगितले की, “मला क्षणभर या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. या आनंदामुळे आमच्या कुटुंबियांना रात्रभर झोप देखील लागली नाही.” यापुढे हरीशने सांगितलेले की, त्याचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. या जिंकलेल्या पैशातून त्याला आता एक घर बांधायचे आहे. त्याचप्रमाणे त्याच्या बहिणीचे लग्न करायचे आहे. आणि तो एक छोटे दुकान देखील टाकणार आहे. हरीशने एक कोटी रुपये जिंकल्याची बातमी कळता क्षणी त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी त्याचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील तो चांगलाच प्रसिद्ध होत आहे.