हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाच्या या दुस-या लाटेने मनोरंजन विश्वातही तितकाच हैदोस घातला आहे. दरम्यान अनेक सेलिब्रिटीं व त्यांच्या कुटुंबाना कोरोनाची लागण झाली होती. तर अनेक सेलिब्रिटींनी आपला तसेच आपल्या अनेक प्रियजनांचा जीवही गमावला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता ‘ड्रिम गर्ल’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभ हिचेही कोरोनाने निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. रिंकुची चुलत बहिण चंदा सिंह निकुंभ हिने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयुषमान खुरानाच्या ‘ड्रिम गर्ल’ या चित्रपटात रिंकूने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
नहीं रही 'ड्रीम गर्ल' एक्ट्रेस रिंकू सिंह निकुंभ, कोरोना से हुआ निधन
आगे पढ़े…..#RinkuSinghNikumbha #RinkuSinghNikumbhaPassesAway #RinkuSinghNikumbhaDied #COVID19 #DreamGirl https://t.co/ktocSMfdzQ— Dainik Bhaskar Hindi (@DBhaskarHindi) June 4, 2021
‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृृत्तानुसार, २५ मे २०२१ रोजी रिंकूचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यानंतर ती पूर्णवेळ होम आयसोलेशनमध्ये होती. पण तिचा ताप उतरत नसल्याने तिला उपचारासाठी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. पहिल्या दिवशी तिला सामान्य वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. मात्र तिच्या तब्येतीत सुधारणा होत नाही हे पाहून तिला लगेच दुस-याच दिवशी आयसीयूमध्ये शिफ्ट केले गेले होते. रिंकू याआधीच दम्याच्या आजाराने ग्रस्त होती. अशात तिची प्रकृती आणखी बिघडली व तिने अखेरचा श्वास घेतला.
https://www.instagram.com/p/CFDAuMXp9Iz/?utm_source=ig_web_copy_link
दम्याच्या त्रासामुळे रिंकूचे उपचारादरम्यान श्वास घेणे आधीहून अधिक संघर्षमय झाले होते. अखेर तिची कोरोनाशी लढत उपचारा दरम्यान अयशस्वी झाली आणि तिने जगाचा निरोप घेतला. रिंकूने ७ मे २०२१ रोजी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. लवकरच ती या लसीचा दुसरा डोसदेखील घेणार होती. रिंकूच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी काही जण ठीक झाले आहेत मात्र अद्याप काही जण पूर्णपणे ठीक झालेले नाहीत. रिंकूने चिडियाघर व बालवीर यांसारख्या हिंदी मालिकेत काम केले होते. हॅलो चार्ली या वेबसीरिजमध्येही ती एका मुख्य भूमिकेत झळकली होती.