Paper Cup Side Effects : देशात चहाचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. अनेकांच्या जीवनाचा चहा म्हणजे महत्वाचा भाग आहे. थंडीच्या दिवसात चहा पिणाऱ्यांचे प्रमाण वाढते तेव्हा लोक चहा-कॉफी दिवसातून 3-4 वेळा पीत असतात. अशा वेळी जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे देखील तुमच्यासाठी घातक असते.
दरम्यान, तुम्ही बाहेर गेल्यानंतर पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफी नक्कीच पीत असाल. मात्र तुम्हाला माहित आहे का पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफी तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते. याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे जी तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे.
पेपर कप तयार करण्यासाठी प्लास्टिक किंवा मेणाचा लेप केला जातो. कप मजबूत करण्यासाठी आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी हे लेप केले जाते. परंतु हा लेप बिस्फेनॉल ए (बीपीए), फॅथलेट्स आणि पेट्रोलियम-आधारित रसायनांसारख्या अनेक हानिकारक रसायनांनी बनलेला आहे. बीपीए हे एक हानिकारक रसायन आहे जे हार्मोन्सवर परिणाम करू शकते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफी प्यायल्याने बीपीएची पातळी वाढू शकते. त्यामुळे बीपीएची पातळी वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.
BPA आणि Phthalate चे तोटे
बीपीए हे हार्मोन डिसटर्बिंग केमिकल आहे. याचा परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो. याशिवाय कर्करोग, लठ्ठपणा आणि हृदयविकारही होऊ शकतो. तसेच, phthalate देखील एक हार्मोन डिसटर्बिंग केमिकल आहे. याचा परिणाम मुलांच्या विकासावर होऊ शकतो. याशिवाय लठ्ठपणा, हृदयविकार आणि कर्करोगही होऊ शकतो.
अॅसिडिटीचा त्रासही होतो
पेपर कपमध्ये चहा/कॉफी प्यायल्यानेही अॅसिडिटीची समस्या वाढू शकते. पेपर कपमध्ये गरम चहा किंवा कॉफी ओतल्याने कपमध्ये उपस्थित कागदाचे छोटे तुकडे होतात. हे तुकडे चहा किंवा कॉफीमध्ये विरघळतात आणि त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय पेपर कपमधूनही संसर्ग होण्याचा धोका असतो.
पेपर कपचे इतर तोटे जाणून घ्या
पेपर कप पर्यावरणासाठीही हानिकारक आहेत. हे कप सहज तुटतात आणि त्यांची विल्हेवाट लावणे कठीण असते. हे कप जळल्यावर हानिकारक रसायने सोडतात, ज्यामुळे वायू प्रदूषण होते.
उपाय जाणून घ्या
– घरी चहा किंवा कॉफी बनवा आणि सोबत घ्या.
– चहा किंवा कॉफी प्लास्टिक किंवा स्टीलच्या कपमध्ये घ्या.
– दुसरा पर्याय नसल्यास पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफी पिणे टाळा.