हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असते. परंतु अनेकवेळा लोक उपाशीपोटी पाणी पितात. बरीच लोक ही सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी पितात. परंतु जर तुम्ही जास्त रिकाम्या पोटी जास्त पाणी पिले, तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आपण सकाळी उठल्या उठल्या किंवा रिकामी पोटी किती पाणी प्यायला पाहिजे. त्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात? याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन
आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाइट्स हे एक महत्त्वाचे खनिज आहे. आपल्या शरीरात होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स मदत करत असते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त पाणी पितो, तेव्हा आपल्या शरीरातील संतुलन बिघडते. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो, डोकेदुखी होऊ शकते.
मूत्रपिंडावर दबाव वाढतो
आपली किडनी ही आपल्या शरीरातील विषारी पदार्थ हे शरीराबाहेर काढून टाकण्याचे काम करत असते. परंतु जेव्हा आपण जास्त पाणी पितो. त्यावेळी किडनीवर दाब देतो आणि किडनी नीट काम करू शकत नाही. म्हणून या कारणामुळे भविष्यात जाऊन किडनीच्या देखील अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये.
हायपोनेट्रीमिया
जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पितात. त्यावेळी तुमच्या शरीरातील सोडियमची पातळी कमी होते. जास्त पाणी पिल्याने आपल्या शरीरातील सोडियम त्या पाण्यात विरघळतो आणि सोडियमची पातळी कमी होते. त्यामुळे आपल्याला अनेक गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते. यामुळे तुम्हाला उलट्या होतात स्नायूंचे आजार वाढतात.
पचन संस्थेवर परिणाम
जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी जास्त पाणी पितात. त्यावेळी तुमच्या पचनसंस्थेवर ही परिणाम होतो. यामुळे गॅस होणे, अपचन, पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
पाणी पिण्याची योग्य पद्धत
तुम्हाला जर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय असेल, तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिल्याने तुम्हाला त्याचा फायदा होईल. यावेळी तुमची पचन संस्था देखील चांगली सक्रिय होईल. तसेच तुम्ही जेव्हा रिकाम्यापोटी पाणी पितात. त्यावेळी एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. तुम्ही पाणी हळूहळू प्या. जेणेकरून शरीराला देखील चांगले पोषण मिळेल. अनेक वेळा आपण इंटरनेटवर वाचून जास्तीत जास्त पाणी पीत असतो. परंतु प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज ही वेगळी असते. त्यामुळे तुमचे दिनचर्या शारीरिक हालचाली ओळखून योग्य ते पाणी प्या.