… आणि ‘ती’ला उबेर कॅबचे स्टेरिंग घ्यावे लागले हातात

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कार चालवताना झोपी जाण्याची समस्या बर्‍यापैकी सामान्य आहे कारण आज लोक कामाच्या प्रचंड दबावाखाली असतात आणि कधी-कधी लोक थकतात, ज्यामुळे गाडी चालवताना अचानक त्यांचे डोळे नकळत लागतात ज्यातून अपघात होण्याची दाट शक्यता असते. रस्ते अपघातातील कार चालवताना झोप लागणे हे सर्वात सामान्य कारण आहे. मात्र, जेव्हा एखाद्याची नोकरी ज्यात दुसर्‍या व्यक्तीच्या जीवनाची जबाबदारी देखील असते तेव्हा अशांनी अधिक सावध असलं पाहिजे. कॅब चालवणं असाच एक व्यवसाय आहे. नुकताच एका महिलेन आपल्या उबेर कॅब प्रवासातील जीवावर बेतणार प्रसंगाबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

तेजस्विनी दिव्या नाईक या महिलेने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक बूमरांग व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना या महिलेने सांगितले की, ” तिने पुण्याहून मुंबईकडे उबर कॅब भाड्याने घेतली होती. पुणे-मुंबई प्रवासात कॅबचा ड्रायव्हरला कार चालवताना चक्क २ वेळा झोप लागल्याचे सांगत अशा परिस्थितीत अपघात होता-होता आपला जीव वाचला असल्याचे या महिलेने या व्हिडिओसोबत ट्विटरवर लिहलं आहे. दरम्यान, ड्रायव्हरला वारंवार झोप लागत असल्याचे लक्षात आल्यावर महिलेने कॅब थांबवून स्वतः कॅबचे स्टेरिंग हातात घेतले.

सदर महिलेने शेअर केलेल्या व्हिडिओत पुढे म्हटलं कि,”देवाची कृपा म्हणून मी आज जिवंत आहे. जेव्हा हे घडले तेव्हा मी झोपत नव्हते आणि सुदैवानं मला गाडी कशी चालवायची हे माहित होते. या संपूर्ण प्रकारामुळं संतापलेल्या महिलेने कॅब कंपनीला व्हिडिओ टॅग करत असे लिहिले की, “मला आत्ता खूप राग आला आहे. जर कॅब ड्राईव्हरनी योग्यरित्या विश्रांती घेतली नसेल तर ते प्रवाशांचा जीव अशा प्रकारे कसे काय धोक्यात घालू शकतात.” यानंतर उबर कॅबने ट्वीट करून महिलेला तक्रारदार महिलेचा मेल आयडी आणि फोन नंबर मागितला आहे, तसेच कारवाईचे आश्वासन दिले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here