‘या’ e-bike साठी ड्रायव्हिंग लायसन्सची नाही आवश्यकता !!!

e-bike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । e-bike : सरकारकडून बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक केले आहे. मात्र जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण भारतात अशा काही बाईक्स आहेत ज्या चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसेल. कारण या बाईक्समध्ये कोणत्याही प्रकारचे हाय स्पीड मोटर किंवा पीक स्पीड नाही. चला तर मग भारतात लायसन्सशिवाय कोणत्या इलेक्ट्रिक बाईक्स चालवता येतील हे जाणून घेउयात…

EeVe Xeniaa Price, Images, Mileage & Reviews

EeVe Xeniaa : या वर्षी सप्टेंबरमध्ये, EeVe कडून Xenia मॉडेल लाँच करण्यात आले. ली-आयन बॅटरीने चालणारी ही लो-स्पीड असणारी इलेक्ट्रिक बाईक आहे. या ई-बाईकची रेंज प्रति चार्ज 70 किमी आहे. यामध्ये वापरण्यात आलेली बॉश 250W मोटर या बाईकला ताकद देते. या बाईकची एकूण वजन क्षमता 140 किलो आहे. तसेच यामध्ये देण्यात आलेली 60V 20Ah Li-Ion बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 4 तास लागतात. या बाईकच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या बाईकची किंमत 80,000 रुपयांपासून सुरू होते. e-bike

Hero Electric Flash E2 Scooter With Max Speed 25 km/hr. : Amazon.in: Car &  Motorbike

Hero Electric Flash E2 : ही भारतातील सर्वात स्वस्त लिथियम-आयन बॅटरी-पॅक असलेल्या इलेक्ट्रिक बाईकपैकी एक आहे. यामध्ये 48-व्होल्ट 28Ah लिथियम-आयन बॅटरी दिलेली आहे. या बाईकचा टॉप स्पीड सुमारे 25 किमी प्रतितास आहे. तसेच ही बाईक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4-5 तास लागतात. ही बाईक एका चार्जमध्ये 65 किमीची रेंज देते. Hero Electric कडून Li-ion स्कूटर आणि बॅटरीवर 5 वर्षांची वॉरंटी दिली जाते. त्याची किंमत 59 हजार रुपये आहे. e-bike

Okinawa Lite Electric Bike, Okinawa Electric Scooter, Okinawa Lite, Okinawa  iPraise Plus, Okinawa Scooter, ओकिनावा इलेक्ट्रिक बाइक - KPT Motors,  Kolkata | ID: 23083712273

Okinawa Lite : ही एक युनिक इलेक्ट्रिक बाईक आहे ज्यामध्ये ऑल-एलईडी हेडलाइट, ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी टेल-लॅम्प आणि एलईडी इंडिकेटर मिळतात. या बाईकमध्ये 250-वॅट BLDC इलेक्ट्रिक मोटर आणि 1.25 kWh लिथियम-आयन बॅटरीने दिलेली आहे जी एका चार्जमध्ये 60 किमीची रेंज देते. त्याचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. त्याची किंमत 66 हजार रुपयांपासून सुरू होते. e-bike

AMPERE REO PLUS

Ampere Reo Elite: Ampere Reo Elite ही एक पारंपारिक दिसणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी Honda Dio प्रमाणे, ऍप्रनवर हेडलाइट्ससह येते. यात प्रीमियम एलईडी हेडलाइट आणि टेललाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट डॅशबोर्ड, फ्रंट ऍप्रन पॉकेट आणि यूएसबी चार्जिंग आउटलेट मिळते. या बाईकमध्ये 250-वॅट एबीएलडीसी हब मोटर दिलेली आहे आणि त्याचा वेग 25 किमी/ताशी आहे. ई-स्कूटरसाठी लिथियम-आयन आणि लीड-ऍसिड दोन्ही बॅटरी उपलब्ध आहेत. लिथियम-आयन बॅटरीने सुसज्ज असलेले मॉडेल एका चार्जवर 60 किमी धावू शकते. त्याची किंमत 43 हजार रुपयांपासून सुरू होते. e-bike

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bikewale.com/ampere-bikes/reo-elite/

हे पण वाचा :

Multibagger Stock : गेल्या 5 वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Multibagger Stocks : गेल्या आठवड्यात ‘या’ 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मजबूत नफा !!!

Bank Holidays : बँकांना ऑगस्टमध्ये असणार 17 दिवस सुट्टी, सुट्ट्यांची लिस्ट तपासा

बँकेच्या ATM द्वारे घरबसल्या दरमहा कमवा हजारो रुपये !!!

HDFC च्या ग्राहकांना धक्का !!! कंपनीचे होम लोन महागले