१५० किमीचा पायी प्रवास करत दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे 

पाणी मिळावे या मागणीसाठी जत ते मंत्रालय निघालेले दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी आज सांगलीत पोहचली. दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करून सांगली मार्ग दुष्काळाग्रस्तांची ही दिंडी मुंबईकडे रवाना झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या राजकारणामुळे तालुक्यातील पाणी प्रश्न सुटू शकत नसल्याचा आरोप यावेळी तुकाराम महाराज यांनी केले आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातल्या पूर्व भागातील ४६ गावं वर्षानुवर्ष पाण्यापासून वंचित आहेत. तालुक्यात दाखल झालेल्या म्हैसाळ सिंचन योजनेत  ४६ गावांचा समावेश नाही, त्यामुळे पाणी मिळावं या मागणीसाठी पूर्व भागातील दुष्काळग्रस्त मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघाली आहेत. जत तालुक्यातील अध्यात्मिक गुरु आणि बागडे महाराजांचे शिष्य तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली राजकारण विरहित दुष्काळग्रस्तांची दिंडी मंत्रालयाकडे जात आहे.संख येथून सुरू झालेली ही पाण्याची दिंडी आज दुपारी सांगली मध्ये पोहोचली. त्यावेळी दुष्काळग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत मुंबईकडे आपला मोर्चा वळवला, २० जून रोजी अधिवेशना दरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर ही पायी दिंडी दाखल होणार आहे.

तुकाराम महाराजांनी तालुक्यातील राजकारणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा प्रश्न रेंगाळत पडल्याचा आरोप केला आहे. वंचित असणाऱ्या गावांना अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरून मायथळ तलावातील पाणी कॅनॉल खुदाई करून व्हसपेठ येथील तलावात सोडल्यास पाणी मिळू शकतो आणि पाण्याचा कायमचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे सरकारने एक तर तालुक्यांना वंचित गावांना पाणी द्यावे किंवा लोकसहभागातून दहा किलोमीटरचा कॅनॉल खुदाई करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी तुकाराम महाराजांनी केली आहे.

Leave a Comment