Drugs Case : सिद्धांत कपूर आधी बॉलीवूडच्या ‘या’ बड्या सेलिब्रिटींचीही ड्रग्ज प्रकरणात झाली आहे चौकशी !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Drugs Case :बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हीचा भाऊ आणि बॉलिवूडचे सुपर व्हिलन मानले जाणारे शक्ती कपूर यांच्या मुलगा असलेल्या सिद्धांत कपूर याला रविवारी रात्री बेंगळुरू येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. सिद्धांतवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार, सिद्धांतची ड्रग्ज टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. मात्र अशा प्रकारच्या ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड स्टार्सची नावे येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही NCB ने ड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या स्टार्सची चौकशी केली आहे. चला तर मग त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात…

Rhea Chakraborty alleges being co-erced into making "incriminatory  confessions"

अलीकडील काळात बॉलीवूड मधील सर्वांत गाजलेल्या प्रकारणांपैकीच एक प्रकरण म्हणजे सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या… सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक बॉलिवूड मधील अनेक स्टर्सची नावे ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आली. यावेळी त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिलाही NCB ने ड्रग्ज घेतल्याप्रकरणी अटक केली होती. एका रिपोर्टनुसार, NCB कडून झालेल्या चौकशीत रियाने ती स्वतः ड्रग्ज घेत असल्याचे कबूल केले. यावेळी तिने अनेक मोठ्या स्टार्ससह जवळपास 25 लोकांची नावे उघड केली होती. तसेच या ड्रग्ज प्रकरणी रियाला जवळपास एक महिना तुरुंगावास देखील सोसावा लागला होता. Drugs Case Shraddha Kapoor wants to do a comedy film with dad Shakti Kapoor; Says 'It  will be lovely' | PINKVILLA

2020 साली दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडशी संबंधित लोकांची नावे ड्रग्ज प्रकरणात पुढे आली होती. त्यावेळी श्रद्धा कपूरही NCB च्या रडारवर आली. एका रिपोर्टनुसार,श्रद्धाच्या एका चॅटमधून ती सीबीडी तेल वापरत असल्याचे उघड झाले. यानंतर सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी श्रद्धाला NCB ने जबाब नोंदवण्यासाठी बोलावले गेले. Drugs Case

Deepika says Gehraiyaan role was 'hard to digest' for her family -  Hindustan Times

दीपिका पदुकोणवरही ड्रग्ज घेतल्याचा आरोप केला गेला आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी NCB कडून दीपिकाची देखील दीर्घकाळ चौकशी केली गेली होती. हे लक्षात घ्या त्यावेळी सुशांतशी संबंधित ड्रग्जच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट समोर आला होता, ज्यानंतर NCB कडून दीपिकाला समन्स बजावण्यात आले होते. Drugs Case

Sara Ali Khan: I feel lucky and privileged | Hindi Movie News - Times of  India

2020 मध्ये सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्जच्या अँगलमध्येही सारा अली खानचे देखील नाव समोर आले होते. यावेळी NCB कडून समन्स पाठवून साराची चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र, या चौकशीदरम्यान तिने ड्रग्ज घेत असल्याच्या वृत्तास स्पष्ट नकार दिला होता. Drugs Case

Times have changed now, says Rakul Preet

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हीचेही नाव ड्रग्ज प्रकरणाशी जोडले गेले आहे. सुशांतच्या मृत्यूदरम्यान NCB ने रकुलला देखील बोलावून अनेक दिवस तिची चौकशी केली होती. Drugs Case

Drug Probe: NCB raids Bharti Singh, husband Haarsh Limbachiyaa's house;  recovers cannabis | Entertainment News – India TV

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनाही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एका बातमी नुसार, 2020 मध्ये NCB ने छापा मारून भारतीच्या घरातून गांजा जप्त केला होता. ज्यानंतर तिला अटक करण्यात आली. यावेळी झालेल्या चौकशीत भारती सिंहने आपण गांजा ओढत असल्याबाबतची कबुली दिली होती. Drugs Case

Aryan Khan gets clean chit: Here is a look at timeline of events in Mumbai  cruise drug bust case

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणी मुंबई येथून एका क्रूझमधून अटक करण्यात आली होती. यानंतर आर्यनने जवळपास एक महिना तुरुंगात काढला मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, या प्रकरणी आता NCB कडून आर्यनला क्लीन चिट मिळाली आहे. Drugs Case

Ananya Panday's latest photoshoot pictures will leave you mesmerised |  Hindi Movie News - Times of India

ड्रग प्रकरणी अनन्या पांडेची देखील चौकशी करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन खानच्या मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणात अनन्या पांडेची NCB च्या टीमकडून दोनदा चौकशी केली गेली. Drugs Case

Fardeen Khan recalls death hoaxes about him: 'Twice it was said I've died'  - Hindustan Times

2001 साली अभिनेता फरदीन खान यालाही ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे. यावेळी फरदीनला 9 ग्रॅम कोकेनसह पकडण्यात आले.

Arjun Rampal Tells NCB That He Is Not The 'Arjun' They Are Looking For

अभिनेता अर्जुन रामपालही एकदा ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुनची पार्टनर गॅब्रिएला डिमिट्रिएड्सचा भाऊ ड्रग्ज प्रकरणात आरोपी आढळला होता, त्यानंतर NCB ने संशयाच्या भोवऱ्यात अर्जुनच्या घरावर छापा टाकला, जिथून NCB बीला अभिनेत्याविरुद्ध काही पुरावे मिळाले. यानंतर सुशांतच्या प्रकरणादरम्यान NCB कडून पुन्हा अर्जुनची चौकशी केली गेली. Drugs Case

हे पण वाचा :

शक्ती कपूरचा मुलगा सिध्दांत कपूर पोलिसांच्या ताब्यात; ड्रग घेतल्याचा आरोप

rave party काय असते ??? मोठ्या घरातील तरुणांमध्ये त्याची क्रेझ का वाढते आहे ???

रिंकूचा साडी मधील कतीलाना अंदाज.

मानुषी चिल्लरचा नवा लूक चर्चेत.

निया शर्माची कतीलाना अदा..