हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Drugs : भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कारवाया थांबता थांबेना. भारत-पाक सीमेवरील श्रीगंगानगर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाने पुन्हा एकदा 3.5 किलो हेरॉईन जप्त केले आहे. यावेळी चार तस्करांना अटक करण्यात आली आहे. या हेरॉईनची बाजारातील किंमत 15 कोटी रुपये आहे. हे हेरॉईन ड्रोनद्वारे सीमेवरील भारतीय हद्दीत फेकण्यात आले आहे.
आता अटक करण्यात आलेल्या तस्करांची बीएसएफ कडून चौकशी केली जात आहे. गेल्या आठवडाभरात सीमेवर ड्रग्ज (Drugs) पकडले जाण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. या आधीही ड्रोनच्या माध्यमातून येथे अमली पदार्थांची तस्करी केली गेली आहे.
गजसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खयालीवाला चेक पोस्टजवळ हे Drugs जप्त करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे बीएसएफला माहिती मिळाली. यानंतर बीएसएफने चार तस्करांना अटक केली,तसेच त्यांच्या ताब्यातून 3.5 किलो हेरॉईन देखील जप्त केले. एका बंडलमध्ये हे ड्रग्ज ठेऊन ते ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत पाठववण्यात आले.
बीएसएफ कडून पकडण्यात आलेले चारही तस्कर हे पंजाबचे रहिवासी आहेत. आता त्यांची चौकशी केली जात आहे. याआधीही सीमेवर अनेकदा ड्रग्ज पकडण्यात आले आहेत. सात दिवसांपूर्वीच 5 तस्करांना देखील अटक केली गेली आहे. यावेळी सुमारे 35 कोटी किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
हे लक्षात घ्या कि, पाकिस्तानातून ड्रोनद्वारे भारतीय सीमा ओलांडून Drugs पोहोचवले जातात. त्यानंतर ते पंजाबमध्ये पोहोचण्याचे काम स्थानिक तस्कर करतात. गेल्या वर्षभरापासून यामध्ये खूप वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीएसएफ अत्यंत सावधगिरी बाळगत आहे. मात्र असे असतानाही सीमेपलीकडून येथे अनेकदा ड्रग्ज पाठवण्यात येते.
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिले दुप्पट पैसे !!!
देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतरही ‘हा’ आमदार मुख्यमंत्र्याच्या भेटीला; पाठींब्याबाबत म्हणाले…
Investment : लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणे कसे फायदेशीर असते ??? अशा प्रकारे समजून घ्या
HDFC चा ग्राहकांना धक्का !!! सात दिवसांत दुसऱ्यांदा कर्जाच्या व्याज दरात वाढ
Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी??? त्याविषयी जाणून घ्या