कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थान परिसरात केलेल्या अतिक्रमाणांमुळे पावसाचे पाणी शिरले होते. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वळविल्याने आणि आढवल्याने हा प्रकार झाला असून ते पूर्ववत करण्या संदर्भात सूचना दिल्या असल्याचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले.
अचानक मोठा पाऊस पडला होता. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता, मात्र खासदार साहेबाच्या निवासस्थानांचे नुकसान जास्त प्रमाणात झालेले नाही. अतिक्रमाणांची आम्ही पाहणी केली असून तलाठी आणि सर्कल यांना प्रवाह नैसर्गिक करण्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. बांधकाम मोठे असून सदरच्या बांधकाम व्यावसायिकांने परवागी घेतली असेल असे वाटते. मात्र तरीही त्याची सर्व माहिती घेवून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच व्यावसायिकाने अतिक्रमण केले असल्यास ते काढून घेतले जाईल.
काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अतिक्रमण
कराड आणि मलकापूर भागात पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. तरी पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी पाणी शिरण्यास अतिक्रमण जबाबदार असून ते एका राष्ट्रीय काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांने केले आहे. तसेच हे अतिक्रमण जवळपास 8 फूट केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तेव्हा त्यांच्यावर कारवाई होणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.
खालील लिंकवर बातमीचा Video पहा
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/4703087769705758