औरंगाबाद – औरंगाबादहुन दिल्लीसाठी एअर इंडिया आणि इंडिगोची विमानसेवा सुरू आहे. या विमान सेवेमुळे दिल्लीला अवघ्या 2 तासात पोहोचणे शक्य झाले आहे. मागील वर्षभरात एक लाखांवर प्रवाशांनी दिल्लीला विमानाने ये-जा केली. तर मुंबई-औरंगाबाद-मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या लाखाच्या जवळ आहे.
औरंगाबादहुन सध्या दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद साठी विमानसेवा सुरू आहे. कोरोनामुळे बंगळुरू आणि अहमदाबादचे विमानसेवा खंडीत झाली आहे. दिल्लीला जाण्यासाठी आज घडीला सचखंड एक्सप्रेस आहे. रेल्वे बरोबरच दिल्लीसाठी हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. गतवर्षी सकाळच्या वेळेत ही दिल्लीसाठी विमान सुरू झाले होते. त्यामुळे सकाळी दिल्लीला जाऊन सायंकाळी परत ही येता येत होते. परंतु तिसऱ्या लाटेमुळे दिल्लीचे सकाळचे विमान बंद झाले. सध्या सायंकाळीच विमान सुरू आहे. मुंबईसाठी रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. त्याचबरोबर विमानानेही मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रात बंगरूळू येथे शिक्षण घेणाऱ्या नोकरी करणाऱ्यांसाठी विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरते. कोरोनामुळे ही विमानसेवा खंडीत झाली होती. परंतु पहिली लाट ओसरल्यानंतर ही विमानसेवा डिसेंबर 2020 मध्ये पुन्हा सुरू झाली. परंतु दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा बंद पडली. बंगळुरूसह अहमदाबाद साठी विमानसेवा सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
औरंगाबादेतून दिल्ली मुंबईला विमानाने गेल्यानंतर कनेक्टींग फ्लाईट नाही तर शहरी गाठले जाते. गेल्या वर्षभरात चेन्नईला 1241 कोलकाता येथे 447 जयपूर येथे 342 आणि वडोदरा येथे 3 प्रवाशांनी प्रवास केला.