उन्हामुळे भाविक वाहनाच्या सावलीत झोपला अन्… 

Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – उन्हामुळे लाहीलाही झालेला भाविक एका महिंद्रा पिकअपच्या पाठीमागील सावलीत झोपल्याने त्यास पिकअपने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात पंढरपूर येथे झाला.

लिंबेजळगाव येथील नामदेव लक्ष्मण गवळी (34) हा शेतकरी प्रत्येक एकादशीला पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी येत असत. सोमवारी सुद्धा गवळी हा सकाळी साडेसहाच्या सुमारास लिंबेजळगाव येथून पंढरपूर येथे विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी आला होता. दर्शन झाल्यानंतर दुपारी कडक उन पडल्याने तो दोनच्या सुमारास मुख्य रोडवर असलेल्या एका महिंद्रा लोडिंग पिकअपच्या सावलीला बसला. तेथेच तो झोपी गेला. त्यानंतर पिकअप चालक आला व पिकअप सुरू करून मागेपुढे करून भरधाव वेगात निघून गेला. दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या या अपघातात गवळी हा चिरडून गंभीर जखमी झाला. त्यास सायंकाळी सातच्या सुमारास उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताचा तपास करताना पोलीस अंमलदार वसंत जिवडे यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यातील डायमंड इलेक्ट्रिकल्स या दुकानाच्या कॅमेरात या अपघाताचे चित्रण झाल्याचे दिसून आले. एका अज्ञात पिकअप चालकाने निष्काळजीपणाने व पिकअप सुरू करण्यापूर्वी पूर्वी मागेपुढे व खाली काही आहे का, हे न पाहता पिकअप सुरू करून गवळी यास चिरडल्याचे दिसून येते.