हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली आहे. बऱ्याच देशात लॉकडाऊन आहेत. भारतातही लॉकडाऊन लागू असल्यानं लोक घरात दाबून आहेत. लॉकडाऊनच्या काळात आपला वेळ घालवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत आहे. यात क्रिकेटपटू सुद्धा मागे राहिले नाही आहेत. सध्या कोरोनामुळे क्रिकेट स्पर्धा बंद आहे. अशा वेळी आपले क्रिकेट स्टार कुटुंबासोबत घरी वेळ घालवत आहेत.
अनेक जण सोशल मीडियावरून काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. पण त्याच बरोबर मोकळ्या वेळेत काही गंमतीशीर व्हिडिओ देखील शेअर करत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणारा भारतीय संघातील सलामीवीर शिखर धवनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लॉकडाऊनंतर घरी पत्नीच्या आदेशावरून घरातील काम करतानाचा एक धम्माल व्हिडिओ शिखरने काही दिवासांपूर्वी शेअर केला होता. आता शिखरने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याच्या अंगात अभिनेता जितेंद्र संचारला आहे.
या व्हिडिओत शिखरने बायको आयशा सोबत ‘ढल गया दिन, हो गई शाम’ या गाण्यावर डान्स केला. या व्हिडिओत दोघंही नवरा-बायको रेट्रो लुकमध्ये दिसत आहेत. शेखरने जितेंद्रच्या स्टाइलमध्ये कपडे घातले आहेत आणि आयशाने लीना चंदावरकर या अभिनेत्रीसारखा रेट्रो लुक केला आहे. हमजोली चित्रपटातील या गाण्यात जितेंद्र आणि लीना यांनी बॅडमिंटन खेळत अभिनय केला होता. तर शिखर आणि आयशाने टेबल टेनिस खेळत अभिनय केला आहे.
View this post on InstagramHo gayi shaam jaane do jaana hai ???????????? @aesha.dhawan5 #JeetendraJi
सोशल मीडियावर शिखरच्या या व्हिडिओवर नेटिझन्स जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. याआधी शिखरने घरात पडे धुवत आणि वॉशरूम साफ करताना असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत शिखरची पत्नी आयशा त्याला काम करण्याचे ऑर्डर देत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना हिंदी चित्रपटातील ‘जब से हूई है शादी…’ हे गाणं जोडले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??
९ महिन्यांची गर्भवती महिला करोना पॉझिटिव्ह, डॉक्टरांसमोर प्रसूतीचं आव्हान
गुड न्युज : ५ दिवसांच्या बाळाने केली कोरोनावर मात, मुंबईतील ‘त्या’ बाळाचे रिपोर्ट आले निगेटीव्ह
‘या’ देशात कोरोना व्हायरस शब्द उच्चारायला बंदी, मास्क घातला तर शिक्षा