सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
कृषिमंत्री दादा भुसे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज जिल्ह्यातील विविध भागांना भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी किन्हई येथे शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्यपालांना टोला लगावला. “राज्यपाल महोदयांना सुबुद्धी मिळो आणि एकदा का सही झाली की शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा होईल,” असे विधान भुसे यांनी केले.
कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज सातारा जिल्ह्यातील विविध भागांना भेट देत तेथील शेतकऱ्यांची संवादही साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. दरम्यान त्यांनी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्याकडून बारा आमदारांच्या नियुक्तीप्रश्नी केल्या जात असलेल्या दुर्लक्षबाबत मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांच्या आमदारकीबाबत राज्यपालांकडे विनंती केली असल्याचे म्हणाले.
दरम्यान कृषिमंत्री दादा भुसे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना नाव न घेता टोला लगावला. “मुंबईमध्ये बसून कारभार न करता उंटावर बसून शेळ्या हाकणाऱ्या आणि काडीने मलम लावून पोपटपंची करण्याचे काम काहींकडून केले जात आहे. असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता लगावला आहे.