हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाचा दसरा मेळावा हा ऑनलाइन पध्दतीने होणार नसुन ऑफलाईन होणार आहे. मात्र यंदा शिवाजी पार्क वर दसरा मेळावा न घेता माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे,अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल. या मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील”.
यापूर्वी शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर यापूर्वीचे दसरा मेळावे होत असत. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी हा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. तर यावर्षी हॉलमध्ये ५० टक्के उपस्थितीत हा मेळावा साजरा होणार आहे.