ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा करणे शूद्रांचे कर्तव्य; भाजपच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

BJP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकिय वर्तुळात नवा वाद निर्माण होईल असे वादग्रस्त वक्तव्य नुकतेच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मां यांनी केले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी, “ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्तव्य आहे” असे म्हणले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

गेल्या 26 डिसेंबर रोजी हिमंत बिस्वा सर्मां यांनी x आणि फेसबुकवर एक ऑडिओ-व्हिज्युअल पोस्ट अपलोड केली होती. यामध्ये गीतेतील 18 व्या अध्यायातील संन्यास योगाचा 44 वा श्लोक अपलोड केला होता. ज्यात म्हटले होते की, “शेतीचे काम, गाई पालन आणि व्यापार ही वैश्यांची कर्तव्य आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्तव्य आहे”

याबरोबर हिमंत बिस्वा सर्मां यांनी असे ही म्हणले होते की, भगवान श्रीकृष्णांनीच वैश्य आणि शूद्रांच्या कर्तव्यांचे प्रकार स्पष्ट केले. सध्या शर्मा यांनी केलेल्या या पोस्टमुळेच राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. तसेच, विरोधकांनी शर्मा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या टीकेनंतर सर्मां यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट हटवली आहे.

मुख्य म्हणजे, सर्मां यांच्या पोस्टचा नोंदवण्यात आल्यानंतर गुरुवारी त्यांनी एक पोस्ट करत वाद संपवण्याचा प्रयत्न केला. ज्यात त्यांनी म्हणले की, सोशल मीडियावर दररोज भगवद्गीतेचे श्लोक अपलोड केले जातात. माझ्या टीममधील एका व्यक्तीने 18व्या अध्यायातील 44व्या श्लोकाचा चुकीचा अनुवाद पोस्ट केला आहे. या पोस्टमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो.