हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एसबीआय (SBI) आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास योजना (SBI Scheme) आणत असते. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना सर्वाधिक फायदा होतो. एसबीआयची अशीच एक योजना आहे जी ग्राहकांना चांगला परतावा देत आहे. या योजनेचे नाव आहे वार्षिक ठेव योजना. (Annual Deposit Scheme) या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दरमहा समान मासिक हप्त्यांमध्ये मूळ रक्कम दिली जाते. तसेच खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर तिमाहीत चक्रवाढीच्या आधारे व्याजही मोजले जाते. त्यामुळे सध्या ही योजना चांगलीच लोकप्रिय ठरत आहे.
एसबीआय ने दिलेल्या माहितीनुसार, ॲन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये तुम्ही महिन्याला 36, 60, 84 किंवा 120 जमा करू शकता. ही योजना प्रत्येक एसबीआयच्या शाखेत उपलब्ध आहे. या योजनेमध्ये तुम्ही हवे तितके पैसे जमा करू शकता. परंतु मासिक वार्षिकेनुसार किमान ठेव रक्कम 1000 रुपये असायला हवी. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास योजना मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. यासह पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवर मुदतीपूर्व पेमेंट ही करता येऊ शकते.
खास म्हणजे या योजनेअंतर्गत एकल किंवा संयुक्त खाते उघडता येऊ शकते. तसेच, व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार वार्षिकी शिल्लकच्या 75 टक्के पर्यंत ओव्हरड्राफ्ट/कर्ज गुंतवणूकदाराला मिळवू शकतो. या योजनेअंतर्गत ॲन्युइटी पेमेंट ठेवीच्या पुढील महिन्यात नियोजित तारखेपासून केले जाणार आहे. तसेच TDS केल्यानंतर पुढे ॲन्युइटी पेमेंट लिंक केलेल्या बचत खात्यात वा चालू खात्यात जमा करण्यात येईल. खास म्हणजे या योजनेत वैयक्तिक नामांकन सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचे खाते बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत देखील हस्तांतरित करता येते.