हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earn Money : जर आपल्याला दर महिन्याला एक लाख रुपयांपर्यंतची कमाई करायची असेल तर आता ते अजिबात अवघड राहिलेले नाही. आपल्याला नोकरीसोबतच अतिरिक्त उत्पन्नाच्या रूपात ही रक्कम मिळवता येईल. यासाठी आपल्याला कुठे पैसे देखील गुंतवावे लागणार नाही. यासाठी आपल्याकडे फक्त एक खास कौशल्य असावे लागेल. चला तर मग या खास प्रकारच्या कामाबाबतची माहिती जाणून घेउयात…
:max_bytes(150000):strip_icc()/Stocksy_woman-writing-laptop_476082-57ab432d3df78cf459975331.jpg)
तर सध्याच्या डिजिटल युगात अनेक कंपन्यांच्या वेबसाइटसाठी कंटेंट रायटरची गरज भासते आहे. काही कंपन्या तर कायमस्वरूपी कंटेंट रायटर्सना कामावर घेत आहेत तर काही छोट्या कंपन्या फ्रीलांसरद्वारे आपले काम करून घेत आहेत. तर मग अशा कंपन्यांसाठी आपल्याला फ्रीलान्सिंगचे काम करता येईल. हे जाणून घ्या कि, देशातील अनेक कंपन्यांना हिंदी-इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये कंटेंट हवा आहे. Earn Money

प्रत्येक कंपनीला आपल्या युझर्ससाठी उपयुक्त ठरेल किंवा त्यांना वाचण्यासाठी आकर्षित करेल अशा प्रकारच्या युनिक कंटेंटची गरज असते. यासाठी या कंपन्यांकडून फ्रीलांसर्सना प्रति शब्द चांगली किंमत देखील दिली जाते. फ्रीलान्स कंटेंट रायटिंगमध्ये 40 पैसे ते 1 रुपये प्रति शब्द पैसे दिले जातात. मात्र, ते आपल्या लिखाणावर (टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल) अवलंबून असेल. याशिवाय इंग्रजी, हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेमध्ये कंटेंट लिहिण्यासाठी वेगळे मानधन असते. Earn Money
![]()
जर आपण एखाद्या कंपनीसाठी फ्रीलान्सर म्हणून कंटेंट लिहीत असाल आणि त्यासाठी प्रति शब्द 1 रुपये दिले जात असतील, तर अशा प्रकारे एका दिवसात 3,000 शब्द लिहून 3,000 रुपये आणि दरमहा सुमारे 90,000 सहजपणे मिळू शकतील. सध्याच्या काळात देशात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाले आहेत. ज्यांच्यासाठी फ्रीलान्स रायटर म्हणूनही आपल्याला काम करता येईल. यासाठी Fiverr आणि Upwork सारख्या वेबसाईट्स खूपच लोकप्रिय आहेत. याशिवाय स्वतंत्रपणे लिखानासाठी आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांशी देखील संपर्क साधता येईल. Earn Money

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.upwork.com/freelance-jobs/content-writing/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन भाव पहा
Investment Tips : डेट म्युच्युअल फंड की एफडी यांपैकी जास्त रिटर्न कुठे मिळेल ? तज्ज्ञांकडून समजून घ्या
BSNL च्या ‘या’ प्लॅनद्वारे वर्षभर रिचार्जपासून सुट्टी, डेली 2GB डेटा सोबत मिळवा आणखी फायदे
New Business Idea : कोणत्याही खर्चाशिवाय ‘हा’ व्यवसाय सुरू करून दरमहा हजारो रुपये कमावण्याची संधी
Samsung Galaxy F14 5G : अगदी कमी किंमतींत खरेदी करा Samsung चा नवा फोन, पहा फीचर्स अन् किंमत




